मुंबई

Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभेचा तिढा सुटला? प्रताप सरनाईकांच्या पत्र व्हायरल

pratap sarnaik letter : ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपने आपला दावा करत इच्छुकांची यादीही पुढे केली होती.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे लोकसभेवरून आजही शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे सुरु आहेत. त्यात ही जागा कोणाच्या पारड्यात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही, असे असताना, दुसरीकडे शिंदे गटाच्या इच्छुकांच्या यादीतील उमेदवार असलेले आमदार प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे.

या पत्रात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या उमेदवारीकरिता अर्ज दाखल करणार आहे. तरी माझ्या विरूध्द वसई-विरार, मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का? त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. त्यांच्या या पत्रामुळे हा मतदार संघ राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आल्याची चर्चा जोर धरू लागली असून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपने आपला दावा करत इच्छुकांची यादीही पुढे केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने हा मतदारसंघ आपला असल्याने त्यांनीही जागा सोडण्यास नकार दिला. त्यांनीही इच्छुकांची यादी जाहीर करत, उमेदवारांची चाचपणी सुरू केली. याचदरम्यान ठाकरे गटाने उमेदवाराच्या नावाची घोषणा ही केली.

तरी सुद्धा महायुतीकडून उमेदवाराचे घोषित न करता, प्रचाराला सुरू केली. दोन्ही पक्षाकडून प्रचार सुरू ठेवल्याने या जागेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शिवसेनेकडून धनुष्यबाण तर भाजपकडून कमळ याच चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होताना दिसत आहे. तर मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात आल्यावर ते उमेदवाराची घोषणा करतील असे भाजप कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र त्यांनी उमेदवार किंवा हा मतदारसंघ कोणाला जाईल याबाबत काही जाहीर न करता तो तिढा कायम ठेवला. त्यातच आमदार संजय केळकर यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले.

येत्या 20 एप्रिल रोजी पासून अर्ज भरण्यास सुरू होणार आहे. त्यातच 20 मे रोजी निवडणूक होणार आहे. तरी सुद्धा उमेदवार जाहीर न केल्याने हा तिढा वाढल्याची चर्चा रंगत असताना, आमदार सरनाईक यांचे लेटरहेड असलेले एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यामध्ये सरनाईकांनीआगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या उमेदवारीकरिता अर्ज दाखल करणार आहे.

तरी माझ्या विरूध्द वसई-विरार, मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का ? त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी माझ्याविरूध्दच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी, असे पत्र सरनाईकांनी वसई विरार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना दिले आहे. यावरूनच सरनाईकांना उमेदवारी जाहीर झाली असेच म्हणावे लागेल. याशिवाय हा मतदारसंघ राखण्यात शिंदे गटाला यश आले असेही दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT