MLA Sanjay Kelkar sakal
मुंबई

MLA Sanjay Kelkar : पक्षाने संधी दिली तर लढणार

ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप कडून या जागेवर दावे प्रतिदावे करण्यात येत आहे.

अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नुकतेच पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत, पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केला आहे. तर, कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील, असा विश्वास देखील केळकर यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगू लागली असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोघांकडून हि या जागेवर दावे करण्यात येत आहे.

त्यात नुकत्याच भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाणे हे भाजपसाठी महत्वाचे असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. त्यात पुन्हा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्यचे सांगितले.

ठाणे लोकसभा हा पारंपारिक भाजपचा मतदार संघ आहे. या मतदार संघावर रामभाऊ कापसे हे भाजपचे खासदार होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी नगरसेवक अधिक असल्याचे गणित मांडले. त्यावेळी शिवसेनेला ही उमेदवारी देण्यात आली आणि प्रकाश परांजपे हे तीनदा खासदार झाले.

परंतु आता गणित मांडायचे झाले तर ठाण्यात भाजपचे आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक आहे. असे असले तरी सर्वच गणितावर अवलंबून नसते. पक्षाचे वरिष्ठ नेते अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे ही जागा भाजपला मिळाली तर कार्यकर्ता सुखावेल, असेही आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT