Devendra Fadnavis sakal
मुंबई

Thane Loksabha Election : देवेंद्र फडणवीस नाराजांची मनधरणी करणार कि कानमंत्र देणार

ठाणे लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर उमटला होता.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ठाणे लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर उमटला होता. त्यावेळी नाराजनाची मनधरणी करण्यात ठाणे भाजप्लायश आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर नुकतेच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील ठाणे भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याचे सांगत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

त्यावेळी देखील पदाधिकार्यांनी तावडे यांच्या समोर नाराजी व्यक्त केली होती. त्यात आज शनिवारी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेसाठी ठाण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस हे नाराजांची मनधरणी करणार कि कानमंत्र देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाणे लोकसभा कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर महायुतीच्या जागा वाटपात ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने भाजप पदाधिकार्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. अनेक पदाधिकार्यांनी राजीनामे देखील दिले होते.

यावे पक्षश्रेष्ठी व स्थानिक आमदारांकडून समजूत काढीत मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत, मनधरणी करीत मोदींना पुन्हा पंतप्रधान कऱ्याचे असल्याने कामळलागण्याचे आवाहन केले होते.

नुकतेच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील ठाणे भाजप कार्यालयात हजेरी लावत, भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाºयांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी काही पदाधिकाºयांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले.

मात्र आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचे असल्याचे सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी तावडे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाअधिक मताधीक्य कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सुचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान, अशातच शनिवारी दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचार सभेसाठी ठाण्यात येत आहेत. या सभेत देवेंद्र फडणवीस काय बोलणार, नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार की नाराजन कणमंत्र देणार हे पाहणे औत्सुकयाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT