pratap sarnaik Sakal
मुंबई

Pratap Sarnaik : नाव जाहीर झाल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची तयारी

ठाणे लोकसभा मतदार संघाला 30 वर्षांचा इतिहास असून ही परंपरा दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनीही कायम ठेवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ठाणे लोकसभा मतदार संघाला 30 वर्षांचा इतिहास असून ही परंपरा दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनीही कायम ठेवली आहे. दिघेंप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो अंतिमच राहील.

तसेच उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. मंगळवारी शिवसेना आमदार विजय शिवतरे यांच्या पाठोपाठ आमदार प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबटच्या चर्चेनंतर ते बंगल्यातून बाहेर पडल्यावर प्रसार माध्यमांना सामोरे गेले.

मीरा भाईंदर येथे रस्त्याची काम होत नव्हती. ती कामे होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून काम करण्याचे आदेश दिले आहे. असे  सांगितले. शिवाय उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत आहे.त्याचा रहिवाशांना त्रास होतो. तेथील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे.

ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायला आल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे आणि वेगवेगळ्या इतर मतदार संघातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचेही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट करताना, त्या संदर्भात या आठवड्यात उमेदवारांच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ठाण्याची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळावी. या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास करत, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी करत, सर्वे रिपोर्ट बदलण्याची ताकद महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, आधी महविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे. ते पाहावे त्यांनतर महायुतीमध्ये काय होत ते पाहावे.असेही त्यांनी सुनावले. ठाण्याप्रमाणेच नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे. या दोन्ही जागा मिळाव्या असेही म्हटले आहे. कारण हेमंत गोडसे हे दोन वेळा खासदार झाले आहेत. याशिवाय तिसऱ्यांदा तिकीट मागण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या मनोमिलनाबाबत शिवतरेंचे मौन

सासवड येथे होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सभेची तारीख निश्चित झालेली नाही. तारीख आणि वेळ घेण्यासाठी आलो होतो. तर या सभेला ४५ ते ५० हजार लोक जमतील असा विश्वास विजय शिवतरे यांनी व्यक्त केला. आणखी दोन ते तीन मतदारसंघाची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अजित पवार यांच्या मनोमिलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT