ठाणे - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. त्यात गुरुवारी ठाणे लोकसभेचे शिवसेना शिंदे गत्चे उमेदवार नरेश म्हस्के यांनी वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात नवीन ठाणे स्टेशन, वाहतुक कोंडी, आरोग्य व्यवस्था, क्लस्टर, उद्योग रोजगारांना वाढते बळ, जलवाहतुक आदींसह इतर महत्वाच्या बाबींसह ठाणे, नवीमुंबई, मिराभार्इंदर या शहरांचा सर्वसमावेशक विकासाची हमी देण्यात आली आहे. तसेच या वचननाम्यावर नमो नम:ची छाप दिसून आली. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा वचननामा सादर करण्यात आला.
ठाणे लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी आपला वचननामा जाहीर केला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे आमदार संजय केळकर, निंरजन डावखरे, मनसेचे अभिजीत पानसे, अविनाश जाधव, अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नरेश म्हस्के यांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, वातानुकुलीत गाड्यांचे तिकीट दर कमी करणार, कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणार, मिरा रोड स्थानकाच्या विकासाकडे लक्ष, ठाण्यातून कल्याण, कर्जत आणि कसऱ्याकडे जाणाऱ्या शटल सेवांची संख्या वाढविण्यावर भर, एम्सच्या धर्तीवर नवी मुंबईत सुसज्ज आरोग्य सुविधा, मिराभाईदर येथे अद्ययावत रुग्णालय, ठाणे, नवीमुंबई आणि मिराभार्इंदरमध्ये मोफत रुग्णवाहीका, खारघर येथे ४० हजार क्षमतेचे फुटबॉल स्टेडीअम, बोरीवडे येथे ७ एकर जागेवर कन्व्हेशंन सेंटर, सर्व स्टेडीअम आणि क्रिडा सेवा क्षेत्र मेट्रो, लोकल आणि कोस्टल रोडने जोडलेले असतील, यासाठी प्रयत्न करणार, मतदार संघात क्रिडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवास, कोस्टल रोड, ईस्टर्न फ्री वे विस्तार छेडानगर सर्कल ते साकेत व्हाया आनंद नगर मुंबई ठाणे ४५ मिनिटात होणार, मिराभार्इंदर शहरातील अंतर्गत वाहतुक व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करणार, वाशी ते कोपरखैरणे घणसोली एलीव्हटेड रोडचे काम मार्गी लावले जाणार, मेट्रोचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न, जलवाहतुकीचा नवा पर्याय, जेट्टीच्या परिसरात वॉटर स्पोर्टसला चालना देणार, पहिला झोपडपट्टी मतदारसंघ, प्रगत आणि स्मार्ट शहरांची भरारी, पर्यावरण संवर्धन आणि प्रदुषणमुक्ती, ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे स्थलांतर करुन ऐतिहासीक वारशाचे जतन करणार, घोडबंदर, नागला, वसई किल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करुन त्या भागाला जलपर्यटनाने जोडणार आहे. तर, मिरा भार्इंदरच्या समृध्दीसाठी प्रयत्न करणार, उद्योग रोजगारांना वाढते बळ, नवी मुंबईच्या विकासासाठी देखील विविध प्रयत्न केले जाणार असल्याचेही या वचननाम्यात नमुद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.