ठाणे - आधी कोरोनाचे संकट, सातवा वेतन तर दुसरीकडे पालिकेवर असलेले दायित्व यांमुळे पालिकेची आर्थिक स्थिती आजही पुरेशी सावरू शकलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मालमत्ता करातील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेला ठाणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात ४८.६४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे.
नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे.
नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ५६० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मालमत्ता करातून मार्च-२०२४पर्यंत एकूण ७९२ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे. करदात्यांनी अभय योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. पुढील १५ दिवस ५० टक्के दंडमाफीची सवलत सुरू राहणार आहे. मात्र, त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल.
यामध्ये मोठ्या थकबाकीदारांपासून सुरुवात करून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. शहर विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरण्याचे सामंजस्य नागरिकांनी दाखवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
अभय योजनेचा पुढचा टप्पा
जे करदाते १६ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी व कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या ५०% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीवर ५०% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यानी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही.
प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे
मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असूdन कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३०ते सायं. ५.००तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी १०.३०ते दुपारी ४.०० व रविवार सकाळी १०.३०ते दुपारी १.३०या वेळेत कराचा भरणा करता येईल.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच Google Pay, PhonePe, PayTm, BhimAppयाद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रभागसमिती निहाय झालेली वसुली
प्रभाग समिती एकूण वसुली टक्केवारी
उथळसर ४०.५१ ७२%
नौपाडा कोपरी ७९.११ ७६%
कळवा २०.०० ५६%
मुंब्रा ३६.२० ७५%
दिवा ३७.८१ ७३%
वागळे इस्टेट २३.०० ६८%
लोकमान्य सावरकर २३.९० ६३%
वर्तकनगर ९१.७० ७१%
माजिवडा मानपाडा १९३.०१ ६९%
मुख्यालय ६५.६१ ८५%
एकूण - ६१०.८६ ७७%
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.