Thane News: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर, दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन घडले. या मतदान केंद्रावर पारंपरिक पद्धतीचा पेहराव केलेले केंद्र प्रमुख व कर्मचारी दिसून आले. तर, केंद्राच्या बाहेर टोपल्या, बोट, रांगोळी काढण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात. त्यात ठाणे जिल्ह्यात ५ व्या टप्प्यात मतदान प्रक्रिया २० मे रोजी पार पाडले. अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती, मतदानाचा प्रचारप्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
असे असताना, दुसरीकडे यंदाच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात तेथील संस्कृतीवर आधारित एक आगळेवेगळे मतदान केंद्राची निर्मिती करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव मतदान केंद्र क्रमांक ३२१ हे जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे. हे मतदान केंद्र असलेले गावात ६६८ मतदार आहेत.
या मतदान केंद्रावर यंदा कोळी आगरी समाजाची छाप दिसून आली. या मतदान केंद्रावर मासळी पकडण्यासाठी वारण्यात येणारे जाळी, मासळी विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी काढण्यात आल्याचे फासून आले. तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी हे पारंपारिक कोळी आगरी पेहराव्यात दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.