मुंबई

Thane News: मुंब्रा विभागातील ३९ जणांची तडकाफडकी बदली

सकाळ वृत्तसेवा

Thane News: अवजड वाहने, चालकांकडून हप्ते वसुली करणारे मुंब्रा वाहतूक पोलिसांचे ‘रॅकेट’ पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उद्धवस्त केले आहे. रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी हे रॅकेट घोळका घालून वाहनचालकांकडून चिरिमिरी पासून ते हजारो रुपयांची वसुली करत होते.

याची खातरजमा होताच या रॅकेटमध्ये सक्रीय असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षकापासून ते शिपायांपर्यंत तब्बल ३९ जणांवर कारवाई करत पोलिस आयुक्तांनी त्यांची एका रात्रीत मुख्यालयात बदली करून ‘नजर कैद’ केले आहे. आतापर्यंत अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात मुंबई पोलिसांच्या पाठोपाठ ठाणे पोलिसांचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय एमडी प्रकरण असो वा कॉलसेंटर स्कॅम, आतापर्यंत ठाणे पोलिसांनी मोठ मोठे रॅकेट उद्वस्त केले आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाला एकप्रकारे मरगळ आली होती.

एकीकडे राजकीय गुन्हेगारी वाढत असताना स्वता पोलिसच हप्तेखोरीत व्यस्त असल्याचा आरोप होत होता. मात्र काही आठवड्यांपूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालायमध्ये एक काळ गाजवलेल्या अधिकार्‍यांची ‘घर वापसी’ झाली आहे. यामध्ये स्वता पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा समावेश आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान असताना त्याची सुरुवात त्यांनी आपल्या खात्यातील ‘प्रवृत्ती’ पासूनच केली आहे. याचा पहिला दणका मुंब्रा वाहतूक विभागाला मिळाला आहे.

ठाणे शहरातून उरण येथील जे एन पी टी आणि गुजरात, दिल्ली या भागातून मोठ्या प्रमाणावर ठाणे मार्गे आवजड वाहतूक होत असते. या मार्गावरील ही वाहतूक सुरळीत ठेवणे आणि गुन्हेगारी कारवाया रोखणे हे वाहतूक पोलिसांचे मुख्य काम. पण त्याऐवजी कंटेनर आणि मोठमोठी वाहने अडवून वाहतूक पोलिस हप्ता वसुल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

शिळफाटा, कल्याण फाटा येथे अशाच प्रकारचे हप्ते वसुली सुरू असल्याचे चित्रीकरण एका जागरूक नागरिकांने करून ते पोलिस आयुक्त डुंबरे यांच्या नजरेस आणून दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्त डुंबरे यांनी मुंब्रा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस शिपाई या सर्वांची एका रात्रीत बदली करून त्या सर्वाना मुख्यालयात आणून बसवले आहे.

वॉर्डनची मदत

वाहतूक सुरळीत राहावी त्याचे परिचलन करणार्‍या वाहतूक पोलिसांच्या मदती करिता ट्रॅफिक वार्डन ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनेच वाहतूक पोलिस वसुली करत असल्याचे चित्र सध्या ठाण्यात नजरेस पडत आहे. सध्या केवळ मुंब्रा बायपास मार्गावरच नव्हे तर ठाण्यातील महामार्गावर आणि मोठया रस्त्यांवरही एकसाथ दहा ते पंधरा जणांचा वाहतूक पोलिसांचा घोळका दिसतो. हे पथक वाहनांना अडवत असून नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

पुढील क्रमांक कासारवडवली

कासारवडवली वाहतूक विभागात देखिल अशाच प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या प्रर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कारवाईसाठी पुढचा क्रमांक कासारवडवली वाहतूक शाखेच्या पोलिसांचा असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले

योग्य बंदोबस्त करा

खाजगी वाहतूक करणार्‍या बस मालककडून कापुरबावाडी आणि कोपरी नौपाडा या वाहतूक विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात हप्ता जातो. त्यामुळेच बिनधात विनपरवाना वाहतूक केली जात आहे. त्यांचा देखिल आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - ते ट्वीट खरं ठरलं! हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३ स्पर्धक

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नरधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

Latest Maharashtra News Updates: : पुणे- मुंबई मार्गावर खासगी बसला आग

SCROLL FOR NEXT