ठाणे पोलिसांच्या (thane police) आर्थिक गुन्हे शाखेनं (economic offences wing) ४३ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुंतवणूक करुन अधिक परतावा देण्याचं आमिष दाखवून बिल्डरने गुंतवणूकदारांना तब्बल ५.५ कोटी रुपयांना (More than five crore fraud) गंडा घातला आहे. याप्रकरणी उल्हासनगर येथून आरोपी बिल्डरला पोलिसांनी अटक केलीय. मनमोहन आयलीन संघानी असं अटक (builder arrested) केलेल्या बिल्डरचं नाव आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Thane police of economic offences wing arrested a builder manmohan ailin sanghani in money fraud crime)
याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी मनमोहन दुबई येथून येत असताना पोलिसांनी त्याला विमानतळावर पकडल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी दिलीय. "२०१५ मध्ये आरोपीनं त्याच्या आठ भागिदारांसोबत उल्हासनगरमध्ये एका प्लॉटमध्ये बांधकाम सुरु केलं होतं. नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या पैशांवर अधिकचा परतावा देण्याचं आमिष या आरोपींनी दाखवलं होतं." अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
"आरोपीने सुरवातीवा गुंतवणूकदारांना काही रक्कम परत दिली. मात्र नंतर पैसे देणे बंद केलं. गुंतवणूकदारांचा विश्वास तोडल्याने आणि त्यांची फसवणूक केल्याने गेल्यावर्षी एमपीआयडी कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता." अशी माहिती निशिकांत कर्लीकर यांनी दिलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.