Human Trafficking sakal
मुंबई

Human Trafficking : थायलंडमधील महिलांची उल्हासनगरात वेश्या व्यवसायासाठी तस्करी,सितारा लॉजमधून 15 महिलांची सुटका

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : ता.4-काही दिवसांपूर्वीच ठाणे क्राइम ब्रांचच्या एंटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने उल्हासनगरात मारलेल्या धाडसत्रात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

या धाडीत किरण राजदेव या दलाल महिलेला अटक केल्याची आणि दोन पीडित तरुणींची वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच,ठाणे खंडणी विरोधी पथकाने देखील उल्हासनगरातील सितारा लॉजिंग बोर्डिंगमध्ये छापेमारी करून थायलंडमधून फसवणूक किंबहूना तस्करी करून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या 15 महिलांची सुटका केली आहे.विशेष म्हणजे आठवड्याभरात दुसऱ्यांदा अशा रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने या शहरावर अय्याशौका शहर असा ठपका बसू लागला आहे.

वर्दळीच्या 17 सेक्शन परिसरात असणाऱ्या सितारा लॉजिंग बोर्डिंगमध्ये विदेशी महिला आणण्यात आल्याची आणि त्यांचा वापर वेश्याव्यवसायासाठी करण्यात येत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती.या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री पथकाने बनावट ग्राहक पाठवल्यावर आणि त्याच्या कडून हिरवा कंदील मिळाल्यावर छापा टाकला.

या छाप्यामध्ये 15 विदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आल्या.चौकशीत त्या सर्व थायलंडच्या असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत घटनास्थळावरून तब्बल 5 लाख 27 हजार रुपये रोख,ग्राहकांच्या नोंदी असलेल्या वह्या,मोबाईल फोन आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत.

यामुळे या वेश्याव्यवसायात सामील असलेल्या इतर आरोपींचाही तपास सुरू करण्यात आला असून सितारा लॉजींग अँड बोर्डींगचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग,रामदास सह 5 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या रॅकेटमध्ये महिलांना थायलंडमधून चांगल्या आर्थिक मिळकतीचे आमिष दाखवून भारतात आणले जात होते आणि उल्हासनगरमधील सितारा लॉजींग अँड बोर्डींगमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या थायलंडच्या 15 महिलांची वैद्यकीय वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर त्यांची रवानगी शासकीय महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

सदर कारवाई ही ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक नरेश पवार,सुनिल तारमळे,विजयकुमार राठोड,सुभाष तावडे,संजय राठोड,सचिन शिंपी,शितल पावसकर,भगवान हिवरे,तानाजी पाटील,अरविंद शेजवळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या सहाय्याने ही धाडसी कामगिरी पार पाडण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

Prasad Oak : "स्ट्रगलच्या काळात आली रस्त्यावर झोपण्याची वेळ" प्रसादने सांगितला तो कठीण काळ , बायकोचे ट्रोलर्सला खडेबोल

Latest Marathi News Live Updates: एकविरा मंदिराच्या विकासकामाचे भूमिपूजन ३९ कोटी रुपये खर्चून केले जाणार - मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT