Naresh Mhaske and rajan vichare esakal
मुंबई

Naresh Mhaske: नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द होणार? राजन विचारेंनी 'असा' टाकला डाव, उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Sandip Kapde

महाराष्ट्राचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मोठा डाव टाकला आहे. राजन विचारे यांनी म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर 22 लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला होता. नरेश म्हस्के यांना ६ लाख ३२ हजार ७८९ मते पडली तर राजन विचारे यांना ४ लाख ५८ हजार ५१९ मते पडली होती. जवळपास १ लाख ७४ हजार मताधिक्यांनी नरेश म्हस्के निवडून आले होते.

उच्च न्यायालयात याचिका दाखल-

राजन विचारे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, नरशे म्हस्के यांना एका प्रकरणात दोषी ठरवले असतानाही त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवले नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला आहे, जो निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारा आहे.

न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या आदेशानुसार नोटीस-

न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे. राज्यात आमदार-खासदारांविरोधातील 404 फौजदारी खटले अद्यापही प्रलंबित आहेत.

देशभरात लोकप्रतिनिधींविरोधात फौजदारी खटले-

मुंबईत 250, औरंगाबादमध्ये 110, नागपूरात 75, पुण्यात 34, ठाण्यात 32, सोलापूरात 30, आणि परभणीत 28 फौजदारी खटले सुरू आहेत. दोषी ठरवलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी घालण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-

सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना लोकप्रतिनिधींविरोधातील सर्व खटले जलद गतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

नरशे म्हस्केंची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे का, हे पुढील सुनावणीत स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा होणार दूर? 'हा' असणार नवा प्लॅन

Manoj Jarange: ..तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो; अंतरवाली सराटीच्या मार्गावर बॅरिकेड्स लावल्याने जरांगेंचा पोलिसांना इशारा

Morning Breakfast Recipe: घरीच झटपट बनवा शिंगाड्याच्या पिठाचा पौष्टिक हलवा, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT