thane youth make ram mandir and flag and sale in discount offers mumbai Sakal
मुंबई

Ayodhya Ram Mandir : ठाण्यातील युवकाची अशी ही रामभक्ती; सवलतीच्या दारात झेंड्यांसह मंदिरांची प्रतिकृती

देशभरात प्रभू श्री रामाचा जयघोष, सर्वत्र प्रभू श्री रामाचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे त्यामुळे सर्व वातावरण भगवेमय झाले आहे.

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : देशभरात प्रभू श्री रामाचा जयघोष, सर्वत्र प्रभू श्री रामाचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे त्यामुळे सर्व वातावरण भगवेमय झाले आहे. निमित्त ठरले ते येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा नयनरम्य सोहळा पार पडणार आहे.

यासाठी राजकीय लोकप्रतिनिधींसह हिंदू सामाजिक संघटनांनी देखील पुधारक घेतला असल्याचे दिसून येत आहे. असे असताना, ठाण्यातील एका युवकाने प्रभू श्री राम प्रती असलेली अनोख्या भक्तीचे दर्शन घडवीत आहे. ज्या भक्तांना या सोहळ्यासाठी अयोध्येला जाने शक्य नाही, अशा भक्तांसाठी राम मंदिराची प्रतिकृती तयार करून सवलतीच्या दारात उपलब्ध करून दिली आहे.

आतापर्यंत २०० राम मंदिरांची प्रतिकृती तयार करून त्याची विक्री केली असल्याची माहिती प्रथम वाघदरे यांनी दिली. गेली अनेक वर्षे हिंदूजन ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे. तो क्षण आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे.

येत्या २२जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. गेल्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर व अगणित न्यायालयीन लढायानंतर राममंदिर न्यासाच्या बाजूने निकाल लागला.

यासाठी अनेक राम भक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. रामलीलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देश विदेशात रामभक्तीची लाट पसरली असल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षा कारणास्तव २२ जानेवारी रोजी कोणीही आयोध्येत येऊ नये असे आवाहन केले आहे.

त्यामुळे अनेकांचे मन व्यथित झाले. हा अद्भुत, ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळेल हे स्वप्न भंगल्याने अनेक भारतीय नागरिकांनी आता पंतप्रधानांच्या आव्हानानुसार घरातच राहून आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.

त्यासाठी राम मंदिराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. त्यासोबतच श्री रामाचे चित्र असलेले भगवे झेंडे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.

ठाण्यात साइन बोर्ड चा व्यवसाय करणारे सतीश वागधरे आणि त्यांचा मुलगा प्रथम वाघधरे यांनी अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या राम मंदिर प्रतिकृती राम भक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ४ इंच पासून ते १४ इंच पर्यंत मध्ये या प्रतिकृती उपलब्ध असून त्याची किंमत अत्यंत माफक ठेवण्यात आली आहे.

एक लहानशी प्रतिकृती बनवण्यासाठी अनेक तासांची कठोर मेहनत करावी लागते व त्यासाठी प्रचंड एकाग्रतेची गरज असते. राम भक्तांसाठी ही आपली प्रकारची सेवाच असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे शहरातील विविध भागात चौकाचौकात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने प्रभू रामाचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. असे असले तरी, या युवकाने नुकत्याच पार पडलेल्या उपवन फेस्टिव्हलमध्ये एक स्टोल लावून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. यावेळी त्यांनी २०० ते २५० झेंड्यांची विक्री झाली असल्याची माहिती वाघधरे यांनी दिली.

झेंड्यांची साईज आणि किंमती

२०*३० - ७० ते ८०

४०*६० - १५० ते २००

९ फुट - ७००

राममंदिर साईज आणि किंमती

४ इंच - ४०० ते ५००

६ इंच - ५०० ते ६००

१६ इंच - ३ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT