Shivdi Navha Sheva Sea Link  sakal
मुंबई

Shivdi-Nhava Sheva sea link Toll: अटल सेतुवरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांचा टोल नेमका किती ? आज होणार निर्णय

Shivdi-Nhava Sheva sea link : मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रुपयांचा टोल प्रस्तावित केला होता. मात्र नगर विकास विभागाने यात हस्तक्षेप करून तो ३५० रुपयांवर आणला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shivdi-Nhava Sheva sea link : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी (मोटार) ३५० रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील उलवे गावाजवळील शिवाजीनगर आणि चिलें (गव्हाण) या दोन ठिकाणी (Toll Naka) पथकर नाके उभारण्याचे प्राधिकरणाद्वारे निश्चित करण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम मंजुरी घेण्यात येणार आहे. भारतातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक चे नामकरण 'अटल सेतू' असे करण्यात आले आहे. मुंबईतून नवी मुंबई आणि उरण, विस्तारित पुण्याचा काही भाग, अलिबाग यांना जोडणारा हा मार्ग लवकरच लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रुपयांचा टोल प्रस्तावित केला होता. मात्र नगर विकास विभागाने यात हस्तक्षेप करून तो ३५० रुपयांवर आणला आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी जपान येथील जायका या कंपनीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले असल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनाच्या पाश्र्वभूमीवर 'एमएमआरडीए' ने टोलची रक्कम निश्चित केली होती.

शिवडी ते न्हावाशेवा पूल सुमारे २२ कि.मी. लांबीचा प्रकल्प आहे. 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' असे प्रकल्पाचे नामकरण प्रकल्पाच्या १७ हजार ८४३ कोटी रुपयांच्या खर्चास सरकारकडून मान्यता देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT