डोंबिवली - ठाणे जिल्ह्यात मित्र पक्षात सारे काही आलबेल असल्याचे वरिष्ठ सांगत असले तरी स्थानिक कार्यकर्ते मात्र आपापसात भिडत आहेत. ठाणे, कल्याणनंतर आता उल्हासनगरमध्ये ही भाजप सेना यांच्यात बॅनरद्वारे वाद सुरू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनरबाजी लावत भाजपच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "कमजोर लोग शिकवा और शिकायत करते है" असा संदेश या बॅनरवर झळकला. याला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी "छोटे काही कार्यकर्ते आहेत ज्यांना आम्हीच शिंदे साहेब आहोत असा गर्व झाला आहे" असे म्हणत मित्र पक्षातील कार्यकर्त्यांचे कान खेचले आहेत.
राज्यात भाजपा-शिंदे गट युतीत असले तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र आलबेल असे काहीच नाही. ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा करत असून शिवसेना आमच्या जागा आम्हीच लढवणार असे ठासून सांगत आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा जागा भाजपकडे येण्यासाठी कार्यकर्ते जोर लावत आहे. तर शिंदे गट देखील तेवढ्याच आक्रमकतेने आपली जागा सिद्ध करत आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा आणि कल्याण, डोंबिवली या परिसरात शिंदे गटाविरुद्ध भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर उल्हासनगर मध्ये शिंदे गटाने आपल्या नेत्यांचे बॅनर लावत भाजपाचे नेत्यांना डिवचले आहे.
उल्हासनगर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. "कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है...! माझा नेता माझा अभिमान" अशा आशयाचे उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये आशान यांनी लावले.
यावरचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आमदार गायकवाड म्हणाले, युतीची सत्ता आल्यावर काही छोटे छोटे कार्यकर्ते आहेत जे आम्हीच शिंदे साहेब आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत अशा आविर्भवात आहेत. त्यांना अस गर्व झाला आहे की त्यांना वाटत आमच्याशिवाय कोणीच नाही...असे म्हणत मित्र पक्षातील कार्यकर्त्यांचे कान खेचले आहेत.
उल्हासनगर मधील शासकीय पाटी व्हायरल...
उल्हासनगर मध्ये एका कार्यक्रमात शासनाच्या वतीने एक फलक लावण्यात आला आहे. यावर आमदार म्हणून गणपत गायकवाड यांच्या ऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उल्लेख आमदार म्हणून केल आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की खरे तर कार्यक्रम करताना सर्व नेत्यांनी याची खात्रीदारी केली पाहिजे. की बाबा आपण कार्यक्रम करतोय आणि एखाद्या आमदाराच्या मतदार संघामध्ये दुसऱ्याचे आमदार म्हणून नाव टाकतो.
याबद्दल नेत्या लोकांनी पण विचार केला पाहिजे,आपण ज्या कार्यक्रमाला जात आहोत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मी तेथील आमदार असताना त्या ठिकाणी गोपाळ लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख केला गेला. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत.पण त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला जातो माझ्या त्यांना शुभेच्छा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.