Ajit Pawar  esakal
मुंबई

Mumbai News : मुंबई शिक्षक मतदार संघात सत्ताधाऱ्यांची 'पत' गेली

मुंबईतील शिक्षकांनी धरली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कास

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटासह भाजप आणि(अजित पवार )राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मुंबई शिक्षक मतदार संघात मोठा दारुण पराभव स्वीकारा लावा लागला आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाची शिक्षक मतदार संघात आपली उरली सुरली 'पत' देखील घालवावी लागली असल्याचे या मतदारसंघाच्या मतमोजणीनंतर दिसून आले आहे.

तर दुसरीकडे माजी अधिकारी म्हणून ओळख असलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (उबाठा) शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी सत्ताधारी पक्षासह शिक्षक भारतीच्या आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष मोरे यांना देखील धूळ चारत सर्वाधिक पसंती क्रमाची 4 हजार 83 मते मिळवून या मतदारसंघात निवडून आले आहेत. यामुळे मुंबईतील शिक्षकांनी उबाठाच्या शिवसेनेला पसंती दर्शवून मुंबईत शिक्षक मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणला असल्याचे बोलले जात आहे. अभ्यंकर यांना मोठ्या प्रमाणात मुंबईतील खाजगी शाळांतील शिक्षकांसह अल्पसंख्यांक आदी शाळांतील शिक्षकांनी मोठी साथ दिल्यानेच ते निवडून आल्याचे दिसून आले आहे.

सुभाष मोरे दुसऱ्या स्थानावर येत ३ हजार ४३४ पसंतीक्रमाची मते मिळवली भाजपकडून जाहीर करण्यात आलेला व भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना १ हजार ९८६ पसंतीक्रमाची मते तिसऱ्या स्थानावर जावे लागले. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांना १ हजार ६३८, पसंतीक्रमाची मते मिळवता आली. अशीच गत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नलावडे यांची देखील झाली. नलावडे यांना केवळ १ हजार ५३६ पसंतीक्रमाची मते देत त्यावरच त्यांना रोखून धरले.

मुंबई शिक्षक मतदार संघात मागील सलग तीन वेळा म्हणजेच 18 वर्षापासून शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे निवडून येत होते. यावेळी मात्र त्यांनी माघार घेत आपल्या विश्वासू असलेले सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु याच संघटनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी निर्माण झाली होती. संघटनेचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी जालिंदर सरोदे यांनी निवडणुकीपूर्वीच उभाटा शिवसेनेच्या शिक्षक सेनेत प्रवेश केला होता. याचा मोठा फटका पाटील यांच्या उमेदवाराला बसला. त्यातच पाटील यांनी प्रचाराच्या अखेरीस मोठ्या प्रमाणामध्ये उभातागटाच्या अभ्यंकर यांच्या विरोधात प्रचाराची मोहीम उघडली होती. त्यांच्यावर अनेक आरोप करत या संदर्भातील तक्रारी केल्या होत्या मात्र मतदारांनी या तक्रारीची कोणती दखल न घेता कपिल पाटील यांच्या उमेदवाराला नाकारल्याचेही दिसून आले.

शिंदे गटाचा उमदेवारही चितपट

शिंदे गटाचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांना सत्तेमध्ये आपला पक्ष असल्याने त्यांना ही निवडणूक सहज वाटत होती. यामुळे त्यांनी सत्तेचा वापर करून अनेक शिक्षकांना अमिषे दाखवली होती. परंतु शिक्षकांनी या आमिषांना न भूलता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पसंती दर्शवली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उभे केलेल्या उमेदवाराला शिक्षकांनी फार पसंती दर्शवली नाही. त्यामुळे त्यांना १ हजार ५३६ मतेच मिळू शकली.

भाजप उमेदवाराला फटका

भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेच्या शिवनाथ दराडे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शिक्षकांची मोठी पसंती होती. परंतु त्यांच्या प्रचारासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनीच पाठ दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपली ताकद लावली होती. तर ऐनवेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी देखील शेवटच्या टप्प्यात प्रचारातून गायब झाले होते. याचा मोठा फटका दराडे यांना बसला. यामुळे भाजपालाही या निवडणुकीत आपली पत राखता आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT