मुंबई

Dharavi News: धाराविकरांची मार्चपासून पात्रता निश्चित सुरू होणार!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: धारावी पुनर्विकासाचे काम अदानीकडून केले जाणार आहे. त्यापाश्वभूमीवर येथे सर्व्हे करून रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचे काम राज्य सरकारच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिका-यांकडून केले जाणार असून त्याची सुरूवात मार्चपासून केली जाणार आहे.

रहिवाशांची पात्रता निश्चिती हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने येथे उपजिल्हाधिका-याच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र टीम तयार केली असून ते प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करून रहिवाशांची पात्रता निश्चित करणार आहेत.

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे सहाशे एकर जागेवर धारावी वसली असून येथे लाखो रहिवाशी आहेत. येथे असलेल्या घरांचा सर्व्हे करणे संबंधिताकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची पात्रता निश्चित करणे मोठे किचकट काम आहे.

त्याची गंभीर दखल घेत एकाही धारावीकरावर अन्याय होऊ नये प्रत्येकाची नियमानुसार पात्रता निश्चित व्हावी म्हणून राज्य सरकारने येथील रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचे काम धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिका-यांकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यानुसार एक उपजिल्हाधिकारी, ४ तहसिलदार, ५ नायब तहसिलदार यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांचे काम मार्चपासून सुरू होणार असून अंतिम यादी तयार केली जाणार आहे. दरम्यान या पात्रता निश्चितीला धारावीकर कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Encounter: आणखी एक एन्काउंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या; एक लाखाचे बक्षिस असलेल्याला पोलिसांनी संपवले

शाब्बास पोरींनो! पुण्याच्या लेकीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चीनला नमवले अन् ऐतिहासिक पदक जिंकले

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

Work Stress Management : कुटुंब आणि ऑफिसमध्ये भरडले जाऊ नका, असं करा नियोजन कामाचा ताप होणार नाही

F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

SCROLL FOR NEXT