Asghar Shirazi sakal
मुंबई

Drugs Crime: मनी लॉड्रिंग प्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर असगर शिराजीची ईडीकडून चौकशी

Chinmay Jagtap

अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने नुकतेच ड्रग किंगपिन अली असगर शिराझी याच्यासह जवळच्या सहकाऱ्याचे जबाब नोंदवले आहेत.अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट प्रकरणात मनी लॉड्रीग आरोपाची ईडी तपास करत आहे. या प्रकरणी तळोजा कारागृहात बंद असलेला विजय राणे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि यूएईला कुरिअर कंपनीचा माध्यमातून अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवत होते.

करियर कंपनीमार्फत तस्करी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या वर्षी मार्चमध्ये अंधेरीतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. कारवाईत 7.8 कोटी रुपये किमतीचे 15.74 किलो केटामाइन आणि 58.31 लाख रुपये किमतीच्या प्रतिबंधित औषधाच्या 23410 स्ट्रिप जप्त केल्या. विशेष पीएमएलए न्यायालयाच्या परवानगीने ईडीने 21 ते 23 डिसेंबर दरम्यान राणे यांचे जबाब नोंदवले होते.

सिंडीकेटची व्याप्ती

सिंडिकेटमधील आपली भूमिका केवळ कुरिअरच्या व्यवसायापुरतीच मर्यादित असल्याचे राणे यांनी उघड केले. या सिंडीकेटचा कैलास राजपूत हा म्होरक्या असून आरोपी शिराझीने त्याच्या सूचनेनुसार कारवाया केल्याचे निष्पन्न झाले. शिराझीने गुजरातमधून अमली पदार्थ तस्करी करून राणेंना पाठवले.राणेंच्या कंपनीने विमानतळ अधिकाऱ्यांच्या मदतीने मालाची चुकीची ओळख दर्शवत परदेशात पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांनी सिंडिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांसह अनेक व्यक्तींची ओळख उघड केली आहे.

ईडीची कारवाई

नोव्हेंबरमध्ये, ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपात शिराझी, कैलाश राजपूत आणि इतरांशी संबंधित असलेल्या मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले. झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांनी 5.5 लाख रुपयांची रोकड आणि 57.11 लाख रुपयांचे सोने जप्त केले.याव्यतिरिक्त, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसह विविध डिजिटल उपकरणे, तसेच दोषी रेकॉर्ड जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT