corona  file photo
मुंबई

दादरकरांनो काळजी घ्या! दरदिवशी १००पेक्षा जास्त रुग्णांची वाढ

दादरमध्ये गेल्या १४ दिवसांत हजारांहून अधिक नवीन कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील दादर परिसरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. गेल्या 14 दिवसांत दादरमध्ये हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. दर दिवशी दादरमध्ये 100 हून अधिक रुग्ण सापडत असून दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे केवळ १४ दिवसांमध्ये दादरमधील रुग्णसंख्या 1हजार 632 वर पोहोचली आहे. बुधवारी (14 एप्रिल) दादरमध्ये 147 रुग्ण सापडले आहेत. त्यानुसार दादरमधील रुग्णांची संख्या 7,712 वर पोहोचली आहे. दादरप्रमाणेच जी नॉर्थमधील माहिम परिसरातही रुग्णांची वाढती संख्या असून दिवसाकाठी 90 ते 100 च्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक रुग्ण हे माहिममध्ये असून 7799 एवढी रुग्ण संख्या आहे.

माहिममध्ये उपचारांधीन रुग्णांमध्येही वाढ -

माहिमध्ये सक्रिय आणि वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असेलल्या रुग्णांची संख्या दादर आणि धारावीच्या तुलनेत सर्वाधिक असून 2085 एवढे आहेत. त्याखालोखाल दादरमध्ये 1978 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर, सर्वाधिक झोपडपट्टी परिसर असणाऱ्या धारावीमध्ये दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णांची संख्या ही कमी असून सक्रिय रुग्ण 1077 एवढे आहेत. धारावीत माहिम आणि दादरच्या तुलनेत दिवसात 60 ते 70 च्या घरात रुग्ण सापडत आहेत. म्हणजेच, सध्या झोपडपट्टी परिसरातील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून उंच इमारतीतींमध्ये रुग्णसंख्या वाढती आहे. धारावीतील एकूण रुग्ण संख्या 5 हजार 839 असून त्यापैकी 4 हजार 443 एवढ्या लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जी नॉर्थमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ -

मुंबईतील जी नॉर्थ वॉर्डमधील धारावी , दादर आणि माहिम परिसरातील कोरोनाची भीती पुन्हा वाढली आहे. एप्रिल महिन्यात या तिन्ही परिसरातील रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मार्च 2021 मध्ये काही दिवस वगळता या ठिकाणी दर दिवशी 50 ते 70 दरम्यान रुग्ण सापडत होते. मात्र, आता दररोज 100 च्या वर रुग्ण सापडत आहेत. 31 मार्चपर्यंत 17 हजार 180 रुग्ण जी नॉर्थ वॉर्डमध्ये होते. ज्यात 14 दिवसांत 4 हजार 170 नवीन रुग्णांची भर पडून ही संख्या 21 हजार 350 वर पोहोचली आहे. त्यामुळे, नागरिकांनी काटेकोरपणे काळजी आणि निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचे मत जी नॉर्थ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केली आहे.

लसीकरणाचे वाढते प्रमाण -

धारावीतील लोकांना 22 मार्चपासून लसीकरण घराजवळ करता यावे यासाठी धारावी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, लसीकरणाचे प्रमाण वाढत असून दर दिवशी 400 ते 450 एवढे लसीकरण केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांची चाचणी केली जात आहे, रुग्ण शोधून त्यांना क्वारंटाईन आणि बेड्स देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लॉकडाऊन लागल्यामुळे त्याचा फरक पडेल आणि रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, असे मत ही दिघावकर यांनी व्यक्त केले आहे.

दादरचा 14 दिवसांचा आलेख -

1 एप्रिल -104

2 एप्रिल -100

3 एप्रिल -92

4 एप्रिल -144

5 एप्रिल -122

6 एप्रिल- 119

7 एप्रिल -144

8 एप्रिल -121

9 एप्रिल -102

10 एप्रिल -119

11 एप्रिल- 108

12 एप्रिल -106

13 एप्रिल -104

14 एप्रिल -147

एकूण  - 1,63

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शिरपूर मधून भाजपाचे काशिराम पावरा विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT