Maghi Ganesh Utsav sakal
मुंबई

Maghi Ganesh Utsav: थाटामाटात येणार बदलापूरचा महाराजा, देखाव्यात आरुढ होणार रामाची प्रतिकृती

मूर्ती देखील प्रभू श्री रामाचा प्रतीक असणारी धनुषधारी अशी सुबक मूर्ती परंपरे प्रमाणे आंबवणे मूर्ती कला केंद्र येथे साकारण्यात येत आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Maghi Ganesh Utsav: सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहराची माघी गणेशोत्सवाची परंपरा ही बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील माघी गणेशोत्सव मंडळ, स्टेशनपाडा अनेक वर्षांपासून जपत आहे. या गणेशोत्सवाचे यंदाचे ५३ वे वर्ष असून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल तर आहेच. परंतु विशेष आकर्षण आहे ते बाप्पासाठी सजणाऱ्या राम मंदिराच्या देखाव्याचे.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक स्व. नितीन देसाई हे जरी हयात नसले, तरीही यंदा देखील एन.डी स्टुडिओ मधूनच हा देखावा साकारण्यात येणार आहे. बदलापूरचा महाराजा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या या गणपतीची यंदाची मूर्ती देखील प्रभू श्री रामाचा प्रतीक असणारी धनुषधारी अशी सुबक मूर्ती परंपरे प्रमाणे आंबवणे मूर्ती कला केंद्र येथे साकारण्यात येत आहे.

४० ते ५० घरे असलेल्या स्टेशनपाडा परिसरात १९६९ साली गणेशोत्सवासाठी २००० रुपये इतकी वर्गणी जमा व्हायची. त्यात अडीच फूट शाडूची गणेशमूर्ती, मंडप, सजावट केले जायचे. शिवाय चार दिवस भरगच्च कार्यक्रम असायचे. ही प्रथा गणेशोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत सुरू होती. रौप्य महोत्सवी वर्षात हा गणेशोत्सव ७ दिवसांचा झाला.

त्यावर्षी प्रथमच बदलापुरात जत्रा भरली गेली. त्यानंतर आता हा गणेशोत्सव आता १० दिवस साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवाचे स्वरूप इतके मोठे असते की, दहा दिवसांत लाखो भाविक दर्शनाला येतात. त्यात नारळाच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असल्याने, बाप्पाला दहा दिवसांत लाखो नारळ अर्पण केले जातात.

यावेळी असलेल्या जत्रेत दोन हजारहून अधिक स्टॉल धारक आपापल्या वस्तू विक्रीसाठी येतात. तसेच आकाश पाळणा व इतर अनेक खेळणी या जत्रेत असल्याने अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींना या जत्रेचे विशेष आकर्षण असते.

यंदा मुख्य आकर्षण व तयारी

बदलापूरच्या माघी गणेशोत्सवाला गणपती बाप्पाचे आगमन इतके भव्य असते की, त्यासाठी रस्ते भाविकांनी फुलून जातात. यंदा मूर्ती कला केंद्रातून मूर्ती बाहेर आणल्यानंतर बाप्पाचे स्वागत हे जंगी स्वरूपात होणारच आहे.

मात्र, यंदा बाप्पाचे मुखदर्शन हे आगमनाच्या मिरवणुकी वेळी गांधी चौक या परिसरात होणार असून, या संदर्भातील माहिती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली. ५३ वर्षाची ही परंपरा जपण्यासाठी मंडळाचे संस्थापक, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ सल्लागार असलेले व प्रसिद्ध मूर्तिकार उल्हास आंबवणे, हरिश्चंद्र थोरात, मंडळाचे सचिव विरेश धोत्रे, अविनाश खिल्लारे, योगेश धोत्रे, दिनेश दहिवलीकर, समीर मिरकुटे, प्रफुल्ल मोडक, राकेश जगे, विनोद जाधव इतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यासाठी वर्षभर परिश्रम घेत असतात.

स्वर्गीय नितीन देसाई नसल्याची खंत!

गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरच्या माघी गणेशोत्सवाला चल चित्रांचा देखावा व इतर अनेक सुंदर व जिवंतपणा असलेले देखावे, सजावट ही सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक स्वर्गीय नितीन देसाई हे स्वतः भेट देऊन, त्यांच्या नियोजनाखाली करून घेत होते. मात्र यंदा ते हयात नसल्याची खंत जाणवत असल्याचे यावेळी आंबवणे यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT