मुंबई: ओमीक्रॉन (Amicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झाला आहे. कोरोनाचा (Corona) फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. लसीकरण (Vaccine) पूर्ण झालेल्यांनाच आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकल (Mumbai local) प्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा याने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी मिळणार आहे.
कोरोनाचे नियम न पाळणार्यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्क वापरला नसेल, तर प्रवाशाला ५०० रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल, तर ग्राहकाला ५००, तर संबंधित दुकानदाराला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला ५० हजार रुपये दंड आकारला जाईल.
राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर ५० हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असेल. वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.