Csmt : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. हे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जात असून ते पूर्णत्वास जाण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे सीएसएमटीच्या पुनर्विकासानंतर विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळणार असल्याने त्याची उत्सुकता सर्वांना आहे.
जानेवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्थानकाचा सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे काम भारतीय रेल्वेने हाती घेतले आहे. सीएसएमटी स्थानकात अनेक नावीन्यपूर्ण बदल होणार आहेत.
यामध्ये सौर ऊर्जा, जलसंवर्धन यांसारखे पर्यावरणाला हातभार लावणारे उपक्रमदेखील सहभागी असणार आहेत. अहलुवालिया काँट्रॅक्ट्स या कंपनीने कामाला सुरुवात केली आहे. यासाठी एकूण २,४५० कोटी खर्च येणार आहे.
कामाची व्याप्ती
कामाच्या व्याप्तीमध्ये डीआरएम कॉम्प्लेक्स (जी+४), विश्रामगृहे (जी+२), प्रवासी-संबंधित किरकोळ इमारती, पार्सल इमारती, यांत्रिकी विभागाच्या इमारती इत्यादी बांधकाम समाविष्ट आहे. पादचारी पूल, स्कायवॉक, हेरिटेज नोड (जी+४) येथे मध्य रेल्वेचे नवीन मुख्यालय, संपूर्ण छताचे नूतनीकरण, फिरत्या भागांचा विकास, हेरिटेज इमारतींचा जीर्णोद्धार, लँडस्केपिंग, कलाकृती, बॅलेस्टलेस ट्रॅक आणि सीमा भिंती यांचा समावेश आहे.
ही कामे पूर्णत्वास
- साईट ऑफिस सेटअप पूर्ण
- ड्रोन सर्वेक्षण, जीपीआर सर्वेक्षण, बॅरिकेडिंगचे काम, माती तपासणी आणि साईटच्या कामांची जमवाजमव पूर्ण
- जागा सर्वेक्षण, हवाई सर्वेक्षण आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १८ पूर्ण
सीएसएमटी स्थानकाचे क्षेत्र
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विकासाचे एकूण क्षेत्रफळ ४,६१,५३४ चौरस मीटर असेल, ज्यापैकी नवीन बांधकाम २,७९,५०७ चौरस मीटर, नूतनीकरण क्षेत्र १,३०,९१२ चौरस मीटर आणि अभिसरण क्षेत्र ३७,७०३ चौरस मीटर असेल. यामध्ये आणि १३,४१२ चौरस मीटरची इतर लँडस्केपिंगची कामे असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.