मुंबई

Thane News: महिन्याभरात ९८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा

EKnath Shinde : ठाणे महापलिका क्षेत्रात उभ्या अराहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली. तर, विधानसभेत देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून रान उठविण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार जानेवारी ते ५ फेब्रुवारी या महिन्याभराच्या कालावधीत ९८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून ११ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ९ बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. मात्र, पालिका प्रशासनाकडून या बांधकांवर थातूर मातुर कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर पुन्हा हि बांधकामे तेजीत उभी राहत होती. याच प्रकारावरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार देखील केली होती. त्यातच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार केळकर यांनी अनधिकृत बांधकामंचा मुद्दा उपस्थित केला.

या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठाणे महापलिका आयुक्तांनी देखील त्याची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार ठाणे पालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा आणि माजिवाडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

१ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२४ या अम्हीण्याभाराच्या कालावधीत ९८ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. तर, ११ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कारवाई दिवा भागातील अनधिकृत बांधकामांवर करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

कोपरीत बांधकामे तेजीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर ककारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. असे असले तरी, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा मतदार संघात मोडणाऱ्या कोपरी भागात मात्र, अनधिकृत बांधकामे मोठ्या दिमाखात उभे रहात असल्याचे दिसून येत आहे. या बांधकाम्णार पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने, या बांधकामांना पालिका प्रशासन अभय देत आहे का ? असा सवाल या निमित्ताने विचारला जावू लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT