मुंबई

मुंबईतील दलित मतदानाचा कल आघाडीकडे?

CD

मुंबई, ता. २७ : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दलित बहुल मतदारांचा कल यावेळी प्रामुख्याने इंडिया महाविकास आघाडीकडे दिसला, असे राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले. मागील वर्षी दलित मतदारांचा कल काहीसा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे होता; परंतु यावेळी संविधान वाचवा हा मुद्दा अत्यंत प्रभावी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी दलित वस्त्यामधील मतदारांचा सूर मतांमधील फाटाफूट टाळून आघाडीकडे जाण्याचा दिसून आला. अनेक साहित्यिक, बुद्धिजीवी आणि संशोधकांनी केलेले आवाहनाने त्यात थोडा फरक पडला.
मुंबईत प्रामुख्याने धारावी, माटुंगा, घाटकोपर पूर्व, रमाबाई नगर, सिद्धार्थ नगर, चेंबूर, गोवंडी विक्रोळी पार्कसाईट, कन्नमवार नगर, वरळी, नायगाव आदी भागात दलितबहुल मतदारांची मोठी संख्या आहे. मुंबईतील पारंपरिक दलित मतदार हा काँग्रेसकडे होता. मागील वेळी तो वंचितने आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले होते. यावेळी मात्र तो वंचित, बसपा आदी पक्षांना सोडून इंडिया आघाडीकडे वळला आहे. विशेष म्हणजे, या मतदारांनी आघ‍ाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) अगदी मोकळेपणाने साथ दिल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
देशातील लोकशाही आणि संविधानही केंद्रातील सरकारच्या धोरणांमुळे संकटात आहे. यामुळे राज्यात वंचितने आघाडीसोबत यावे, अशी येथील दलित मतदारांची भावना होती. मात्र, वंचितने आपला स्वतंत्र पर्याय ठेवल्याने त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर डॉ. सुखदेव थोरात, शामदादा गायकवाड, केशव मेश्राम यांच्यासह राज्यातील असंख्य नेते, साहित्य‍िक, संशोधकांनी खुले पत्र लिहून वंचित आणि बसपासारख्या पक्षांना मतदान न करता आघाडीला मतदान करून भाजपला सत्तेतून उखडून टाकण्याचे आवाहन केले. यामुळे मुंबईतील दलित मतदार हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे झुकल्याचे चित्र मुंबईत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले.
मुंबईतील दलित मतदार हा सुज्ञ आणि शिक्षित असल्याने त्यांना भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या केलेल्या फोडाफोडीचे राजकारण पटलेले दिसले नाही. यामुळे शिंदे गटात गेलेल्या दलित उमेदवारांनाही दलित मतदारांनी आपली फार पसंती दर्शवली नाही. यामुळे हा मतदार भाजप आणि शिंदे गटापासून दुरावला गेला.
--
कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची
वरळी, नायगाव, दादर, शिवडीतील बीडीडी चाळीतील असंख्‍य कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून भूमिका बजावली. तर गोरेगाव, विक्रोळी, घाटकोपर आदी ठिकाणी आपले पक्ष संघटना विसरून दलित पदाधिकारी, नेत्यांनी महाविकास आघाडीला मतदान केल्याने सर्वत्र पारंपरिक दलित मतदार हा आघाडीकडे झुकल्याचे दिसून आले.
--
ासंघटीतपणे लढा
मुंबईत आणि राज्यात मागील दहा वर्षांत विरोधी पक्ष हा एकत्र येऊन संघटीतपणे लढला. त्यांची एकजूट मुंबईतही दिसली. विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या विधानांची दखल सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जाहीरनाम्याची दखल घ्यावी लागली. स्थानिक मुद्दे सोडून केवळ शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरच टीका करण्यात त्यांना वेळ घालवावा लागला.
--
ूमहागाई, बेरोजगारीविरोधात संताप
मुंबईतील दलित मतदारांमध्ये महागाई, बेरोजगारी यावर संताप दिसला. विरोधकांवरील ईडी आदींच्या कारवाया आणि भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल्याने मतदारांमध्ये मोठा संताप होता. हा संताप मतपेटीतून व्यक्त झाला तर राज्यात शिंदे गटाचे आणि केंद्रात मोदींचे गणित ब‍िघडण्याची शक्यता आहे.
….
मुंबईतील दलित मतदान
--
दक्षिण-मध्य मुंबई
विभाग मतदार टक्के
चेंबूर ३१०४३ १२.२१
अणुशक्तीनगर १५०६१ ६.०९
धारावी ४१२६१ १६.०१
सायन कोळीवाडा १४८५८ ५.८१
वडाळा १८१७८ ८.२६
माहीम ७६०८ ३.०८
--
उत्तर पूर्व मुंबई
विभाग मतदार टक्के
मुलुंड १९८४८ ६.८७
विक्रोळी १९६५४ ८.४१
भांडुप प. १३०३३ ४.६६
घाटकोपर प. १९५७० ७.३१
घाटकोपर पू. २३७८४ १६.०३
मानखुर्द ३२१२८ १०.३१

--
उत्तर पश्चिम
विभाग मतदार टक्के
जोगेश्वरी ११३४९ ३.९९
दिंडोशी १२८६२ ४.५३
गोरेगाव १३९८२ ४.३६
वर्सोवा ८०२० २.९
अंधरी प. १०१७९ ३.३४
अंधेरी पू. १११३२ ४.०९
--
दक्षिण मुंबई
विभाग मतदार टक्के
वरळी ३१४१४ ११.५८
शिवडी १४४२४ ४.९७
भायखळा १५७६७ ६.१९
मलबार हील १५८७२ ५.३७
मुंबादेवी १०३२२ ४.१७
कुलाबा १०२६० ३.७६
--
उत्तर मध्य मुंबई
विभाग मतदार टक्के
विलेपार्ले १००५४ ३.८
चांदिवली २३३४५ ६.२९
कुर्ला ३७४२४ १३.७७
कलिना १३३७४ ५.६६
वांद्रे पू. १६९३७ ६.९७
वांद्रे प. ८१०९ २.८४
--
उत्तर मुंबई
विभाग मतदार टक्के
बोरिवली ११६२० ४.०५
दहिसर ७७८३ ३.९४
मागाठाणे ११९९३ ४.५५
कांदिवली पू. १११०९ ४.२१
चारकोप ९३८९ ३.३४
मालाड प. ८८३२ ३.०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT