मुंबई

Dombivli : मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान असलेल्या मलंग गडावरील फ्युनिक्युलरची प्रतीक्षा संपणार येत्या माघ पौर्णिमेला भाविकांना मिळणार सुविधा

याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे. थोड फार फिनिशिंग काम बाकी आहे. पुढील महिन्यात मलंगगड येथील यात्रा येईल त्यावेळी भाविकांना त्याचा उपयोग होऊन गडावर ट्रॉलीने जाता येईल असे सांगितले.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंग गडावरील कित्येक वर्षापासून रेंगाळलेली फ्युनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी मलंगमुक्तीचे आंदोलन हाती घेतले. दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगभक्त व शिवसैनिक मलंगगडावर दाखल होत येथे धार्मिक उत्सव साजरा केला जातो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर फेब्रुवारी महिन्यात माघी पौर्णिमेला ट्रॉलीची सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देत हिंदू भाविकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले श्री मलंग हे नवनाथांचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान असलेल्या या मलंगमुक्तीचे आंदोलन हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी हाती घेत मंलग गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी महाआरती करत आंदोलन हाती घेतले. दिघे यांच्या निधनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले. दरवर्षी माघ पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक व मलंग भक्त नाथांचा जयघोष करत मलंगगडावर दाखल होत असतात.

श्री मलंगगड हा हिंदू व मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असल्याने वर्षभर गडावर भाविकांचा राबता असतो. सद्यस्थितीत गडावर जाण्यासाठी सुमारे अडिच हजार पायऱ्या आहेत. परंतू उभा चढ असल्याने भाविकांची दमछाक होते. भाविकांची होणारी गैरसोय ध्यानात घेऊन राज्य सरकारने या ठिकाणी फ्युनिक्युलर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बीओटी तत्वावर 2007 मध्ये मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये निविदा प्रक्रिये नुसार मेसर्स सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीला 45 कोटी 91 लाखांचा हा प्रकल्प काम देण्यात आले. कंपनीने दोन वर्षात हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.

मात्र पर्यावरण, वन विभाग व इतर परवानग्या मिळविताना कंपनीची सहा वर्षे निघून गेली. केंद्र शासनाला 1 कोटी 30 लाखांचा भरणा करण्यात आला. परवानग्या मिळाल्यानंतर 2012 साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. डिसेंबर 2015 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नैसर्गिक, तांत्रिक अडचणी यासोबतच आर्थिक चणचणीमुळे काम पूर्ण झाले नाही. तात्कालीन आमदार किसन कथोरे यांनी पाठपुरावा करुन काम सुरु केले होते. मात्र कालांतराने मतदार संघाची विभागणी झाल्याने हा प्रकल्प आणखी रेंगाळला. 80 टक्के काम पूर्ण होऊनही प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याने कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यात लक्ष घातले.

डिसेंबर 2017 ची मुदतवाढ देऊनही कंत्राटदार कर्जबाजारी झाल्याने काम ठप्प होते. 2019 मध्ये तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत या ठेकेदाराला काम पूर्ण न केल्यास काम काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रकल्प कामातील अडथळे दूर करत हे काम हाती घेण्यात आले. राज्यात महायुतीचे सरकार येताच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यात लक्ष घातले. कामाच्या ठिकाणी पाहणी करत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ऑक्टोबर 2022 ला येथे भेट दिली तेव्हा संबंधित कंत्राटदारासोबतच आणखी एका कंत्राटदारास हे काम देऊन ते पूर्णत्वास नेण्यात येत आहे. मे 2023 मध्ये हा प्रकल्प सुरु होईल असे सांगितले होते. मात्र अद्याप तो सुरु झालेला नाही.

मलंगगड परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे. थोड फार फिनिशिंग काम बाकी आहे. पुढील महिन्यात मलंगगड येथील यात्रा येईल त्यावेळी भाविकांना त्याचा उपयोग होऊन गडावर ट्रॉलीने जाता येईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT