Mumbai sakal
मुंबई

Mumbai: मुंबईची तरुण पिढी पुस्तकवेडी! आकडेवारीत मोठी वाढ

दिनेश चिलप मराठे

दक्षिण मुंबईची पुस्तक गल्ली, माटुंग्यातील पुस्तकांच्या दुकानात सरत्या वर्षात तरुणाईची गर्दी वाढली आहे. सरत्या वर्षात पुस्तक विक्रीचे प्रमाण ६५ टक्यावर गेल्याने आर्थिक गणित जाग्यावर आल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. नव्या वर्षात पुस्तक विक्रीला अजून जोर येईल अशी आशा त्यांना आहे.

मुंबईतील सात दशके जुन्या पुस्तक गल्लीत स्पर्धा परीक्षेपासून फिक्शन, नॉन फिक्शन, प्रेरक या सदरातील सर्वच पुस्तके उपलब्ध असतात. हुतात्मा चौक येथील फाउंटन स्ट्रीटवरील जुन्या-नवीन पुस्तकांच्या गल्लीत यंदा वाचकांची वर्दळ वाढल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात. माटुंगा येथील भाऊ दाजी मार्गावरच्या पुस्तकांच्या दुकानात खरेदीस आलेल्या स्नेहल ठाकूर या एनजीओमध्ये काम करतात. पुस्तक वाचनाचा छंद त्यांनी जोपासला आहे.

महिन्याला न चुकता त्या इथे पुस्तक खरेदीसाठी येतात. किंग्ज सर्कलजवळच्या फुटपाथवर जुने क्लासिक्स, कॉमिक्स आहेत ज्यात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्‍या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या उपलब्ध आहेत. त्यात नवनवीन लेखकांच्या पुस्तकांची भर पडतच असते. ऑनलाईनवर जे पुस्तक शंभर रुपयाला मिळते ते पुस्तक आमच्याकडे अवघ्या चाळीस रुपयाला मिळते. शनिवार आणि रविवारी गर्दी चांगली असते. या दोन दिवसात चांगला व्यवसाय होतो, असे पुस्तक विक्रेते काशी विश्वनाथन सांगतात.

इंग्लंड,अमेरिकेतून पुस्तके

इंग्लंड, अमेरिकेसह इतर देशातून कंटेनर भरून किलोच्या हिशोबात पुस्तके हवाई आणि जलमार्गे दिल्ली आणि चेन्नई येथे येतात. घाऊक व्यापारी ती पुस्तके विकत घेतात. त्या पुस्तकांची प्रतवारी होऊन संबधित पुस्तके देशभरात पाठवली जातात. अर्ध्या किमतीमध्ये विशेषतः किलोच्या भावात बडे पुस्तक व्यापारी ते खरेदी करतात. मग दिल्ली, मुंबई कोलकात्यासह अन्य शहरात ती विक्रीसाठी पाठवली जातात. दर्जेदार लिखाण, उत्तम छपाई आणि चकाकणारे ग्लास पेपर प्रिंटमुळे ही पुस्तके हातोहात खपतात.

.....

कोविड काळातील वाईट दिवस संपले आहेत. वाचक पुस्तक खरेदीकडे वळल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली आहेत.

- निलेश त्रिवेदी, ग्लोबल बुक सेंटर

माझ्या आवडीच्या पुस्तकांचा मी घरी संग्रह करतो. नवीन पुस्तके आली तर मी पुस्तक गल्लीत धाव घेतो

- अमित ठक्कर, वाचक

दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र काही दर्जेदार लेखकांची पुस्तकं वाचल्याने माझ्या ज्ञानात भर पडली आहे.

- संजय सिंह, पुस्तक विक्रेते

इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या युगातही विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा ओढा पुस्तक वाचनाकडे आहे. माटुंग्यात अनेक कॉलेज आहेत. त्यामुळे पुस्तक विक्री होते.

- राजेंद्र ठक्कर, पुस्तक विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT