मुंबई : परराज्यातील स्थलांतरित मजूरांना खासगी बसनेही परतीचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी समुहाने अर्ज करावा लागणार आहे; मात्र रेल्वेचा खर्चही न परवडणाऱ्या या मजुरांना बससेवेसाठी अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..
राजस्थानमधील 25 कामगार रविवारी बसने मुंबईतून रवाना झाले. नियमानुसार त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचनांनूसार यासाठी पोलिसांची परवानगी, बसमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. तसेच, बसचे निर्जंतूकीकरणही करावे लागणार आहे.
बस प्रवासात सर्वात मोठी अडचण खर्चाची आहे. परत येताना बस रिकामी आणावी लागणार आहे. त्यामुळे बसचा परतीचा खर्चही प्रवाशांकडूनच वसूल केला जाईल. त्याबरोबर क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी भरायचे असल्याने तो भारही याच प्रवाशांवर येणार आहे. त्यामुळे बसचे भाडे नेहमीपेक्षा दुप्पट, तिप्पट होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार केल्यास साधारण सहा हजार रुपये प्रत्येक प्रवाशाला खर्च येऊ शकतो. मुंबईत साधारण दहा लाखांच्या आसपास स्थलांतरित कामगार आहेत. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान या भागातील कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. येथून कामगारांना पाठवताना संबंधित राज्याला माहिती द्यावी लागणार आहे. त्या राज्याने परवानगी दिल्यानंतरच कामगारांना पाठविता येणार आहे.
या आहेत अडचणी
There is also a bus service for migrant workers, but the cost is double or triple
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.