मुंबई : कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांमुळे सांताक्रुझ पूर्व आणि माटुंगा पूर्व या दोन विभागांनी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे. रुग्ण दुपटीचा हा कालावधी देशातील सर्वाधिक असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
वांद्रे पूर्व, माटुंगा व वडाळ्यामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० वर पोहचला आहे. तर संपूर्ण मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे सरासरी प्रमाण हे ४१ दिवस इतके आहे. कोविड प्रतिबंधासाठी महापलिका सातत्याने विविध उपाययोजना राबवत आहे. चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणारा शोध आणि रुग्णांमागे १५ जणांना प्रभावी क्वारंटाईन, प्रभावी औषधोपचार, निर्जुंतुकीकरण मोहिम राबवल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.
सुरुवातीला कोरोना हॉटस्पॅाट ठरलेले विभाग आता नियंत्रणात आले आहेत. यांमध्ये वांद्रे पूर्व खार पूर्व इत्यादी भागांचा समावेश असणाऱ्या 'सांताक्रुझ पूर्व' आणि माटुंगा, वडाळा या परिसरांचा समावेश असणाऱ्या माटुंगा पूर्व विभागाने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०८ चा टप्पा गाठला आहे.
मुंबई महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळेच कोविड संसर्गास अधिकाधिक प्रतिबंध करण्यास बळ मिळाले आहे असा दावा पालिकेने केला आहे.
these two wards in mumbai makes century in this reason read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.