thieves came to see stolen bike was there and got caught in police trap dombivli crime sakal
मुंबई

Dombivli Crime : चोरलेली बाईक जाग्यावर आहे का पहायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले सराईत चोरटे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - चोरलेली दुचाकी कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये उभी करून ठेवली. चोरलेली गाडी जाग्यावर आहे का हे पहायला ते परत आले आणि चूक करून बसले. गाडीला नंबर प्लेट नसल्याने बाजारपेठ पोलीस त्यावर नजर ठेवून होते.

पोलिसांनी दोघाना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आत्तापर्यंत 3 दुचाकी व 2 रिक्षा चोरल्याची कबुली दिली. वाहिद खान आणि राहूल परिहार अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी चोरीची वाहने हस्तगत केली आहेत.

कल्याणच्या एपीएमसी मार्केट हे वर्दळीचे ठिकाण आहे. फळ आणि भाजीपाल्याच्या गाड्या येथे लागलेल्या असतात. ग्राहक आणि विक्रेत्यांची लगबग येथे कायम असते. याचा फायदा घेत एका दुचाकीवर दोन तरुण फिरत असल्याचे काही लोकांना दिसले.

या दुचाकीला नंबर प्लेट नव्हता. नंबर प्लेट नसलेली दुचाकी फिरत असल्याने त्याठिकाणच्या लोकांना संशय आला. याची माहिती बाजारपेठ पोलिसाना दिली गेली. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश सिंग गौड यांनी या तरुणांची चौकशी करण्याकरीता पोलिस अधिकारी अजिंक्य मोरे आणि काही पोलिसाना पाठविले. पोलिसांनी या दोन तरुणाना ताब्यात घेऊन चौकशी केली. हे दोघे तरुण जी दुचाकी घेऊन आले होते. ती चाेरीची होती. पोलिसांनी जेव्हा त्याला विचारले.

माहिती पडले की, हे दोघे बाईक आणि रिक्षा चोरी करणारे आहे. त्यांनी याची कबूली दिली. त्यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये का फिरत होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही एक दुचाकी चोरी केली होती. ती दुचाकी या मार्केट परिसरात उभी करुन ठेवली होती. त्याच ठिकाणी ती दुचाकी आहे की नाही हे पाहण्यासाठी आलो होतो. या दोघांना पोलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरु केल. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या तीन दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

Lohegaon Airport चे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, आता विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

SCROLL FOR NEXT