मुंबई : देश सध्या कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या भयंकर महामारीच्या संकटाचा सामना करतो आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि गृहमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर राज्यात रेड झोन असलेल्या शहरांमध्ये ३ मेनंतरही लॉकडाऊन कायम राहू शकतं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटलंय.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून २३ मार्चपासून २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन करण्यात आला होता. तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी न झाल्यामुळे १४ एप्रिलला हा लॉकडाऊन पुढे वाढवून ३ मेपर्यंत करण्यात आला. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे राज्यात जे रेड झोन्स आहेत तिथे ३ मेनंतरही लॉकडाऊन कायम राहील असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. मात्र या संबंधीचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय.
देशात मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाचे ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ३५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३६ दिवस संपूर्ण देश बंद असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे जिथे कोरोनाचा अधिक धोका आहे तिथे लॉकडाऊन शिथिल न करण्याची चिन्हं दिसतायेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांना लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत आणि कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याबाबत स्वतःची रणनीती तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच गृहमंत्री अनिल देशमुख लॉकडाऊन कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ३ मेच्या आधीच लॉकडाऊनबद्दल मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
third lockdown might be implemented in mumbai see what home minister is saying
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.