सत्ता स्थापन होऊन साधारण एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय. अशातच अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. या सोहळ्यादरम्यान शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती समोर येणार आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्याकडेच उपमुख्यमंतत्रिपद सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येतेय.
महत्त्वाची बातमी : धक्कादायक! 'या' महापालिकेकडून वर्षभरात केवळ १४ प्रकारची औषधे खरेदी!
विधानभवन परिसरात जय्यत तयारी
विधानसभेच्या प्रांगणात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडेल. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असल्याने विधिमंडळ परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास सातशे जणांच्या बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारामुळे विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेय.
घटक पक्षांमध्ये नाराजी
आज होणाऱ्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही अशी सूत्राची माहिती आहे.
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये 10 कॅबिनेट 3 राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येतेय.
महत्त्वाची बातमी : मोलकरणीशी शारीरिक लगट करायला गेला पण...
WebTitle : thirteen MLAs will take oath as ministers from national congress party
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.