मुंबई : इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर तुम्हाला हवी हवीशी बातमी समोर आली. बातमी आहे थर्टीफर्स्ट संदर्भातील. अखेर महाराष्ट्र सरकारने 31 तारखेच्या रात्री हॉटेल्स पहाटेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 31 तारखेला पाहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि बार सुरु ठेवायला परवानगी मिळाली आहे.
गेल्यावर्षी देखील पहाटेपर्यंत हॉटेल्स आणि बार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र मागच्या वर्षी शेवटच्या क्षणाला ही अनुमती मिळाल्याने अनेकांचे प्लान फसले होते. मात्र यंदा मुंबईकरांसाठीची हि खुशखबर आठवडाभर आधीच आली आहे.
सरकारकडून या संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलंय. या पत्रकात सर्व हॉटेल्स आणि बार मालकांना त्यांच्या हॉटेल्स आणि बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेत. हॉटेल्स आणि बार मालकांनी या सेलिब्रेशन दरम्यान कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. त्या परिसरात असलेली आवाजाची मर्यादा देखील पाळण्याच आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.
दरम्यान, कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस एखाद्या क्षेत्रासाठी वाढीव परवानगी काही काळासाठी रद्द करू शकतात. याचसोबत कोणत्याही बार किंवा हॉटेलमध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्या हॉटेल मालकाचं किंवा त्या जागेवर ताबा असणाऱ्यावर सरकार कारवाई करू शकतं. यामध्ये हॉटेल मालक किंवा बार मालकाचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.
यंदा वेळेआधी परवानगी मिळाल्याने थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्ष साजरं करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्रमांचं योग्य पद्धतीने नियोजन करता येणार असल्याचं इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ने म्हटलंय.
त्यामुळे पार्टी करा मज्जा करा पण आसपासच्या लोकांना आणि सरकारी मालमत्तेला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
WebTitle : on thirty first hotels and bars will remain open till five am in the morning
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.