मुंबई : महानगर पालिकेच्या चतृर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कोरोनाचा कहर झाला आहे. आता पर्यंत 71 कर्मचार्याचा मृत्यू झाला असून 64 मृत्यू हे चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे आहेत.
महापालिकेने कोविड बाधित आणि मृत झालेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार केला आहे (या अहवालाची प्रत सकाळ कडे उपलब्ध आहे). यात घनकचरा विभागातील कर्मचार्याचे सर्वाधिक 20 त्या खालोखाल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 17 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. 71 कामगार कर्मचार्यांचे मृत्यू झाले असून त्यात 6 कर्मचारी हे "सी" श्रेणीतील म्हणजे कनिष्ट अभियंता कनिष्ट क्लर्क या पदावरील आहेत. तर उपायुक्त पदाचे अभियंता शिरीष दिक्षीत यांचा काही दिवसांपुर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचार्यांवर कोविड प्रतिबंधित क्षेत्रातील कचरा उचलण्या बरोबरच रुग्णवाहीका चालवण्याची जबाबदारी दिली आहे. तर आरोग्य विभागातील कर्मचार्यांवर स्थानिक पातळीवर आरोग्य सेवांचे नियोजन आणि अमंलबजावणीची जबाबदारी आहे.
डी श्रेणीतील कर्मचारी हे कोविड संदर्भात काम करत आहेतच. त्याचबरोबर त्यांची राहाती घरे दाट वस्तीत असून प्रवासासाठी ते सार्वजनिक वाहतूकीचा वापर करत आहेत. त्यामुळे त्यांना कोविडची बाधा होण्याची जास्त भिती आहे. यासाठी पालिकेने योग्य नियोजन करण्याची गरज आहे असे 'दि म्युनिसीपल युनियन'चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.
कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचार्यांच्या वारसांना 50 लाखाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आता पर्यंत 12 मृत कर्मचार्याचे मृत्यू दाखले पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर झाले आहेत. तर, सर्व विभागाच्या प्रमुखांना कोविड बाधेमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांचे कागदपत्र तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यासाठी विशेष अधिकार्याचीही नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
विभागवार मृत्यू
मोठी बातमी - क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...
1808 कर्मचाऱ्यांना बाधा
महापालिकेच्या नोंदीनुसार 1 हजार 808 कर्मचार्यांना कोविडची बाधा झाली आहे. तर त्यातील 1 हजार 1053 कर्मचारी कामगारांनी कोविडवर मात केली आहे. यात अ श्रेणीतील 29 अधिकार्यांना बाधा झाली त्यातील 22 जणांनी मात केली यात खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकार्यांचा समावेश आहेत.तर ब श्रेणीतील म्हणजे सहाय्यक अभियंता हेड क्लर्क पदाच्या 295 जणांना बाधा झाली त्यातील 247 जणांनी कोरोनावर मात केली. क श्रेणीतील 416 कर्मचार्यांना बाधा झाली त्यातील 247 जणांनी कोरोनावर मात केली तर ड श्रेणीतील 1068 जणांना बाधा होऊन 569 जणांनी आजारावर मात केली आहे.
threat of novel corona virus and effect on grade fourth workers in BMC
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.