Shashikant Warishe Death : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले आहेत. पत्रकार वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीसे करु, अशी धमकी संजय राऊत यांना केली आहे. राऊत यांना स्वत: ही माहिती दिली आहे.
वारीसे यांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याची ताकीद देखील संजय राऊत यांना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
संजय राऊत म्हणाले, शशिकांत वारीसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली. या प्रकरणी मला सतत फोन येत आहेत. मात्र मी भित नाही, मी जाहीरपणे हा विषय हाती घेतला आहे. मी कोकणात जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफयनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीसे यांचं हत्या प्रकरण सरकारला अडचणीचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळं वारीसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले, "स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळं शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. पण जेव्हापासून राज्यातील सरकार बदललं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री लोकांना वारंवार धमकावत आहेत की कोणत्याही परिस्थित आम्ही रिफायनरी इथं घेऊन येणारचं. जर याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू. अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणचे जे गुंड आहेत त्यांना बळ मिळेल"
"पंधरा दिवसांपूर्वी त्याठिकाणी अंगणेवाडी इथं एक देवीची यात्रा पार पडली. मुंबईहून हजारो लोक या यात्रेला जातात. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत विधान केलं की, रिफायनरी आम्ही घेऊन येऊ कोण रोखतंय ते पाहू. त्यांच्या या विधानानंतर २४ दिवसांनी रिफायनरीला विरोध करणारा युवा पत्रकार शशीकांत वारीसे यांची निर्घृण हत्या झाली. या अर्थ काय आहे? हा केवळ एक योगायोग नाहीए. या हस्तेमागं मोठा कट आहे, मी काय बोलतोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच माहिती आहे. आजवर कोकणात २५ वर्षात जेवढ्या राजकीय हत्या झाल्या आहेत त्यात या घटनेचाही समावेश आहे," असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.