मुंबई ः भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सागर तात्याराम गोरखे, रमेश मुरलीधर गायचोर आणि ज्योति जगताप यांना अटक केली आहे. या तिघांवर प्रक्षोभक भाषणे व हिंसाचार भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिनही आरोपींना 11 सप्टेंबरपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी कबीर कला मंच या प्रतिबंधीत संस्थेही संबंधीत असल्याची माहिती एनआयएने दिली . सागर तात्याराम गोरखे, रमेश मुरलीधर गायचोर आणि ज्योति राघोबा जगताप या तिघांना सोमवारी अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना आज मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी चार दिवस एनआयएच्या ताब्यात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे एजन्सीने सांगितले. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, कंबीर कलामंचा तर्फे विश्राम बाग पी.एस. पुणे येथील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यता आले होते. या कार्यक्रमात आरोपींना प्रशोभक केलेल्या भाषणांमुळे दंगल परिस्थिती घडण्यास कारणीभूत झाली. या सर्व घटनेमागे सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे वरिष्ठ नेत्यांच्या हे आरोपी संपर्कात होते. या घटनेनंतर महाराष्ट्रात मोठी दंगल घडली. त्यात राज्यसरकारचे प्रचंड नुकसान झाले. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तुषार दामगुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जानेवारी 2020 मध्ये या प्रकरणात एनआयएने काँ गौतम नवलखा, आनंत तेलतुंबडे, हय्याबाबू मुसलीविरतिल तराईल यांना अटक केली.
या तिघांच्या चौकशीत सागर, रमेश आणि ज्योती हे नक्षल आणि माओवादी संघटनेचा प्रचार करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ते सरकारने बंदी घातलेल्या संगटनेच्या नेत्यांच्याही संपर्कात होते. तसेच जंगलात त्यांनी (कबीर कला मंच) सदस्यांच्या भेटीदरम्यान माओवाद्यांच्या चळवळीशी संबंधित विविध विषयांवर शस्त्रे आणि स्फोटक प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम घेतल्याचे पुढे केले आहे. तसेच पुण्यातील एल्गार परिषदेती सर्व आखणी मिलिंद तेलुंबडे यांनीच केल्याचे एनआयच्या चौकशीत निदर्शानास आले आहे. या तिघांना एनआयएने त्यांच्या विशेष कोर्टात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
-----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.