Railway mega block sakal media
मुंबई

मुंबई : मध्य रेल्वेवर 72 तासांचा महाब्लॉक; जाणून घ्या सविस्तर माहिती

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरील (central railway) ठाणे ते दिवा (thane to diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे (fifth and sixth lane work) काम पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पाच्या अंतिम कामासाठी 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा ब्लॉक (three days block) घेतला जाणार आहे. त्यानंतर पाचवी आणि सहावी या दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या होतील. दरम्यान, या ब्लॉकमुळे शेकडो लोकल सेवा (train cancelled) रद्द होणार आहेत. तर, अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. यासह कोकण रेल्वेच्या गाड्यांना देखील फटका बसणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्यावतीने (एमआरव्हीसी) ठाणे ते दिवा दरम्यान सुमारे 9 किमी अंतराच्या दोन मार्गिकांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. मागील 14 तासांच्या ब्लॉकमध्ये एक नविन डाऊन जलद मार्गिका सुरू केली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे. तर, 5 ते 7 फेब्रुवारीच्या ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ठाणे ते दिवा दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण ते एलटीटीपर्यंत स्वतंत्र मेल, एक्सप्रेसला जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे.

एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने 5 फेब्रुवारी रोजी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत 72 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवेच्या मार्गात बदल, अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, 5 ते 7 फेब्रुवारीच्या ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर सहावी मार्गिका खुली होईल.

त्यामुळे मेल, एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका सुरू होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कोणत्या गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. कोणत्या मार्गावरील गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत, यासंदर्भात माहिती बुधवारी, (ता.2) रोजी दिली जाईल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

माघी गणेशोत्सव असल्याने गणेशभक्तांनी, चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली आहे. ब्लॉकमुळे चाकरमान्यांना गावाहून येण्याची-जाण्याची अडचण होण्याची शक्यता आहे. तर, मुंबईकरांना 72 तासांच्या ब्लॉकने जबर फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT