Mumbai Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime News : बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरला भावांनी संपवलं; डोक्यात हातोडा घातला अन्...

रोहित कणसे

बहिणीच्या लिव्ह इन पार्टनरची डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आली आहे. या हत्येनंतर पीडिताचा मृतदेह उल्हास नदीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेची पोलिसांकडून तत्काळ दखल घेण्यात आली असून खडकपाडा येथे तिघांना अटक करण्यात आली आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शहाबाज शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात शहाबाज राहायला होता. दरम्यान लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या महिलेसोबत त्याचे सतत भांडण व्हायचे.

दरम्यान एका दिवशी शहाबाज अचानक गायब झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दिली. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी तो लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या तीन भावांना ताब्यात घेतले. इसरार शेख, शोएब शेख आणि हेमंत बिछवाडे अशी या तीघांची नावे आहेत. यांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी शहबाजच्या हत्येची कबुली दिली.

आपल्या बहिणीला शहबाज त्रास देत असल्याचे तिच्या भावांना माहिती होते. त्यामुळे या महिलेचे दोन सख्खे भाऊ आणि एका मानलेला भाऊ अशा तिघांनी शहबाज शेखला एका रिक्षातून निर्जनस्थळी नेले. यानंतर त्यांनी शहाबाजच्या डोक्यात हातोड्याने घाव घातले. या हल्ल्यात शहबाजचा जागीच मृत्यू झाला. शहबाजची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह उल्हास नदीमध्ये टाकून दिला. मृतदेह अद्याप हाती लागला नसून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT