भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात अर्थात राणी बागेत तीन पेंग्विनचा जन्म झाला आहे. मोल्ट-फ्लिपरचे बाळ कोको (मादी); पोपॉय-ऑलिव्हचे बाळ स्टेला (मादी); डोनाल्ड-डेझीचे बाळ जेरीचे (नर) यांचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांमध्ये या बेबी पेंग्विनची छबी टिपण्याची उत्सुकता असणार आहे.
राणी बागेत गेल्या अडीच वर्षांत पेंग्विनची संख्या आठवरून १८ वर पोहोचली आहे. हे प्राणिसंग्रहालय मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्राणी संग्रहालयात मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे.
दररोज पाच ते सहा हजार, सुटीच्या दिवशी १५ ते १६ हजार तसेच शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या २० हजारांवर जाते. त्यामुळे याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंत गेले आहे. तर सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख तर महिन्याचे सरासरी उत्पन्न ४५ लाखांवर गेले आहे. दरम्यान, राणीबागेत नुकताच तीन पेंग्विनचा जन्म झाला होता. त्यांचे नामकरण आज झाल्याने पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वनस्पतीविषयक मालिका
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात जगाच्या एकूण सात खंडांपैकी सहा खंडातील विविध प्रकारच्या वनस्पती-वृक्ष आढळतात. वनस्पतींवर आधारीत नवी मालिका सिल्वन फॉरेस्टच्या प्रोमो व्हिडीओचे अनावरण आज उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या १६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती डॉ. अभिषेक साटम यांनी दिली. यावेळी उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी उपस्थित होते.
या वेळी गांडूळ खत प्रकल्पावर काम करणाऱ्या माळींचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच ‘प्रोजेक्ट मुंबई’ संस्थेने प्लॅस्टिकपासून तयार केलेले १५ बेंचेस, मनराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्राणिसंग्रहालयास मिळालेल्या पाच व्हीलचेअर्सही आज हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.