मुंबई : कोरोना पासून संरक्षणासाठी मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हस वापरले जातात. बऱ्याच लोकांना मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज नेमके कसे वापरायचे हे माहीत नसतं. अनेकदा वापरलेले मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज रस्त्यावर फेकलेले आढळतात, त्यामुळे कोरोना अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्ग सगळीकडेच वेगाने पसरतोय. सरकारने संरक्षणासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. अनेक लोक संरक्षणासाठी हॅन्ड ग्लोव्हज, पीपीई किट देखील वापरतात. मात्र या उपकरणांचा वापर करतांना तो कसा करायचा किंवा वापरून झाल्यानंतर या उपकरणांची विल्हेवाट नेमकी कशी लावायची याबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचदा मास्क किंवा हॅन्ड ग्लोव्हज रस्त्यावर फेकलेले दिसतात. वापरलेली उपकरणे अश्या प्रकारे फेकल्याने किंवा इतर कचऱ्यासोबत टाकून दिल्याने संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असल्याचे ग्लोबल हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन कन्सलटंट डॉ मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले.
मोठी बातमी - भाजप म्हणतंय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार, राज्यपालांच्या दारी जाणार आणखी एक वाद
मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, पीपीई किट किंवा जंतुनाशक यांची विल्हेवाट कशी लावायची याबाबत लोकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. उपकरणे काढुन ती कचऱ्याच्या डब्ब्यात किंवा घरातील कचऱ्यात योग्य प्रकारे टाकणे महत्वाचे असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या.
आपण जेव्हा तोंडावर मास्क किंवा हॅन्ड ग्लोव्हज घालून फिरतो तेव्हा ती उपकरणे दूषित होण्याचा संभव अधिक असतो. शक्यतो हॅन्ड ग्लोव्हज घालू नये. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका 10 पटीने वाढतो. मात्र ज्यांना हॅन्ड ग्लोव्हज वापरावा लागतो त्यांनी एका हातातली ग्लोव्हज काढतांना दुसऱ्या हातातील ग्लोव्हजचा वापर करणे महत्वाचे आहे. हॅन्ड ग्लोव्हजशी आपल्या हातांचा थेट संबंध येणार नाही याचा प्रयत्न करा,तसेच हॅन्ड ग्लोव्हज काढून झाल्यानंतर आपले हात व नख साधारणता 20 सेकंद स्वच्छ धुणे गरजेचे असल्याचे डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले.
आपल्या तोंडाला लावलेला मास्क काढतांना थेट मास्कला स्पर्श न करता त्याला असलेल्या दोरखंडाचा वापर करून मास्क काढणे ही पद्धत योग्य आहे. मास्क किंवा हॅन्ड ग्लोव्हज काढल्यानंतर डोळे,नाक किंवा तोंडाला स्पर्श होणार नाही याची खात्री करा. तसेच मास्क,हॅन्ड ग्लोव्हज काढल्यानंतर आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला ही त्या देतात.
मोठी बातमी - पालकांनो तुमच्या मुलांच्या भल्यासाठी सायबर सेलने दिल्यात 5 महत्त्वाच्या सूचना, नक्की वाचा...
काही महत्त्वाच्या टिप्स
( संपादन - सुमित बागुल )
tips to use face mask and hand sanitizer properly or you have more threat of corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.