Mumbai Local File Photo Esakal
मुंबई

Mumbai Local News: मुंबईकरांचे हाल होणार बंद; आज ब्लॉकचा शेवटचा दिवस!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local News: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लॉकचा उद्या (ता. ५) अखेरचा दिवस आहे. त्यानुसार दिवसभरात ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.

मात्र सोमवारपासून (ता. ६) पश्चिम रेल्वे मार्गावर नियमित लोकल सेवा धावणार आहेत. तसेच सहावी मार्गिकाही लवकरच प्रवासी सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्चिम रेल्वेवर सोमवार (ता. ३०) ते शुक्रवारपर्यंत (३) दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन केले होते; मात्र दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची गैरसयोय होऊ नये म्हणून रद्द केलेल्या अनेक लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांच्या ब्लॉकचा रविवारी अखेरचा दिवस असल्याने दिवसभरात ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत. नवीन मार्गिकेमुळे वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्यांसाठी दोन कॉरिडॉर उपलब्ध होतील.

या मार्गावर मेल-एक्स्प्रेससाठी समर्पित कॉरिडॉर असल्यास लोकल सेवा वाढण्यास मदत होणार आहे, तसेच लोकल सेवांच्या वक्तशीरपणात सुधारणा होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading Closing: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार तुफान वाढीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Arvind Sawant: FIR दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हात्रे, शेलारांची आठवण करुन देत म्हणाले, कायदेशीर...

...तर राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष बंद करावा, महायुतीतील बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, काय म्हणाले?

Suryakumar Yadav ला कर्णधार व्हायचं होतं, त्याने मुंबई इंडियन्सला विचारलही, पण...

Latest Marathi News Updates: बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्र्यांची अरविंद सावंतांवर टीका

SCROLL FOR NEXT