मुंबई : खासगी पुरवठादाराच्या शिवनेरी आणि शिवशाही गाड्यांमार्फत (shivshahi bus) एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे. शिवाय महामंडळाने त्यामार्फत चालक-वाहकांची नियुक्ती करून वाहतूक सुरू केली. त्यातून एसटीचे काही प्रमाणात (st certificate) उत्पन्न सुरू राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, खासगी पुरवठादाराकडून नेमण्यात आलेले कंत्राटी कर्मचारी (contract employee) तिकीट वितरित न करताच पैसे लाटत असल्याचे एसटीच्या वाहतूक विभागाला आढळून आले आहे. त्यामुळे भरारी पथकांकडून मार्गावर तपासणी वाढवण्याचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी दिले आहेत.
एसटीच्या प्रवासी वाहतुकीमध्ये हळूहळू वाढ होत आहे. त्यासाठी खासगी पुरवठादारांकडून शिवनेरी आणि शिवशाही गाड्यांसह चालक-वाहकसुद्धा कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून एसटी प्रशासनाच्या नावाखाली बेकायदा प्रवासी घेऊन त्यांच्याकडून विनातिकीट पैसे वसूल केले जात आहेत. त्यामुळे संप काळात एसटीचा २२०० कोटींपेक्षा अधिक तोटा झालेला असताना आता कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उत्पन्न लाटले जात असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे राज्यभरातील सर्व मार्गांवर तपासणी पथके कार्यान्वित करून त्यांच्यामार्फत विभागातील सर्व बस व बसची दैनंदिन तपासणी करण्यात यावी, खासगी पुरवठादारामार्फत नियुक्त करण्यात आलेले चालक व वाहक दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित पुरवठादाराकडून झालेल्या नुकसानाची वसुली करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणी वाढवण्याचे आदेश
राज्यभरातील सर्व मार्गांवर तपासणी वाढवण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.