BMC sakal media
मुंबई

मुंबई : मालमत्ता करवसुली `रेकॉर्डब्रेक`; ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये करसंकलन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (bmc) उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीत (Property tax collection) मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ७०० कोटी रुपयांची वाढ झाली असून ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षात पाच हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतके करसंकलन (Record break tax collection) नोंदविण्यात आले आहे. महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतचे हे विक्रमी करसंकलन ठरले आहे.

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने सातत्याने नियोजन व आढावा बैठकांचे आयोजन केले. या नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही व आवश्यक तेथे सक्त कारवाई यांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात आली. परिणामी ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षात ५,७९२.२२ कोटी इतकी मालमत्ता करवसुली झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा करसंकलन ७०० कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांनी म्हणजेच १३.७७ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाची करवसुली महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक ठरली आहे. पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता एकूण २१ विभागांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक करसंकलन केले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोविड विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे जनजीवनाला आणि अर्थव्यवस्थेला निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले; मात्र या आव्हानावर यशस्वी मात करून महापालिका प्रशासनाने वाढत्या संख्येने मालमत्ता करसंकलन करून आपले नाणे खणखणीत सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे पालिका हद्दीतील ५०० चौरस फूट व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती/निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे.

वाढ लक्षवेधी...

१) विशेष म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे; तरीही कर संकलनात झालेली घसघशीत वाढ लक्षवेधी ठरली आहे.
२) आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे २४ पैकी ३ प्रशासकीय विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यात जी/दक्षिण विभागाने ३४.३४ टक्के इतकी वाढ नोंदवून अग्रस्थान पटकावले आहे.

२०२१ मध्ये वसुलीच्या वाढ

आधीच्या दोन आर्थिक वर्षांचा विचार करता गेल्या वर्षी म्हणजेच ३१ मार्च २०२१ला संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुली ही पाच हजार ९१ कोटी रुपये इतकी झाली होती; तर त्याआधी म्हणजेच ३१ मार्च २०२० ला संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुली ही रुपये चार हजार १६१ कोटी इतकी झाली होती, अशी माहिती सहआयुक्त सुनील धामणे यांनी दिली. दरम्यान, शासकीय मालमत्ता कर वसुलीतदेखील यंदा १८८.६२ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात २.०१ कोटी रुपये शासकीय मालमत्ता करसंकलन झाले होते; तर यंदा ५.८१ कोटी रुपये म्हणजे ३.८० कोटी रुपये इतके अधिक कर संकलन झाले आहे.

पश्‍चिम उपनगरात सर्वाधिक वसुली (कोटींमध्ये)

विभाग २०२०-२१ २०२१-२२ वाढ टक्केवारी
शहर १,४९६.१० १,७५८.२० २६२.०३ १७.५१
पूर्व उपनगर १,०७०.७१ १,१८८.१६ ११७.४४ १०.९७
पश्‍चिम उपनगर २,५२२.३८ २,८४०.०४ ३१७.६५ १२.५९

या प्रभागांत सर्वाधिक वसुली
जी/दक्षिण ३४.३४ टक्के
एफ/उत्तर ३२.९२ टक्के
पी/दक्षिण ३३.७१ टक्के
एच/पश्चिम २७.९३ टक्के
एच/पूर्व २४.३० टक्के
एफ/दक्षिण २३.७० टक्के

कारवाईला जोर

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी त्यांचा मालमत्ता कर वेळेत जमा करावा, यासाठी यंदा आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात विविधस्तरीय कारवाई करण्यात आली. वारंवार विनंती करूनही व नोटीस देऊनदेखील कराचा भरणा पालिकेकडे न करणाऱ्या पाच हजार ८२१ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली; तर १०१ जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यासोबत आवश्यक तिथे वाहने, वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाईदेखील करण्यात आली.

विभागनिहाय मालमत्ता करवसुली

ए २२२.०४
बी ३९.४८
सी ७२.८५
डी २४४.०८
ई ११०.५९
एफ/दक्षिण १६२.१४
एफ/उत्तर १६१.७७
जी/दक्षिण ५२६.८६
जी/उत्तर २१८.३५
एच/पूर्व ४९७.३६
एच/पश्चिम ३४२.१३
के/पूर्व ५२८.८६
के/पश्चिम ४५३.९०
पी/दक्षिण ३१९.७०
पी/उत्तर २२१.६५
एल २६३.८२
एम/पूर्व ९५.४२
एम/पश्चिम १५२.५०
एन १९२.०८
एस ३१८.३६
टी १६५.९६
आर/दक्षिण २००.१४
आर/मध्य २००.६८
आर/उत्तर ७५.५८
शासकीय मालमत्ता ५.८१
एकूण ५,७९२.२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT