मुंबई

कडधान्य पिकाला साडीच्या कुंपणाचे संरक्षण

CD
कडधान्य पिकाला साडीच्या कुंपणाचे संरक्षण पाली, ता. १३ (वार्ताहर) : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. ही अतिशय वेगळी बाब समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाजवळ दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात असे कुंपण लावलेले शेत दृष्टिक्षेपास पडतात. सुधागड व इतर तालुक्यांतील शेतकरी अशा प्रकारचे कुंपण आपल्या शेतांना लावत आहेत. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेताला करवंदाची जाळी, काटेरी पेरकूट किंवा काट्याकुट्यांचे कुंपण करतात. मात्र, रानमोडीने जिल्ह्यातील करवंदाच्या जाळीचे नुकसान केले आहे. पेरकूट व काट्याकुट्याही कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे कुंपणासाठी घरातील जुन्या साड्या वापरल्या जातात, असे शेतकरी दीपक कोकरे यांनी सांगितले. हे कुंपण तयार करण्यास सोपे आणि कमी खर्चिक व श्रमाचे असल्याने अनेक जण त्याला पसंती देतात. यामुळे कडधान्य पिकाचे गुरे व शेळ्यांपासून संरक्षण होते. तर शेतकरी मनीष पाटील म्हणाले की, गरीब व आदिवासी शेतकऱ्यांसाठी हे कुंपण वरदान ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT