अलिबाग : रायगड जिल्हा परिषद शाळांमधून (raigad zp schools) दर्जेदार शिक्षण मिळावे, गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकारने (Maharashtra government) जिल्ह्यातील १५ शाळा आदर्श शाळा (Ideal school) विकसित करण्याचे निश्चित केले आहे. या योजनेमुळे प्राथमिक शाळांमधील घसरणारी पटसंख्या रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो. यासाठी शासकीय निधीसह कंपन्यांच्या सीएसआर फंडातून (csr fund) व लोकसहभागातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता घसरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी १५ शाळा पहिल्या टप्प्यात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. अलिबाग तालुक्यातील वायशेत, कर्जत तालुक्यातील कळंब, खालापूर येथील चौक, महाड तालुक्यातील वाहूर, माणगावमधील तळाशेत, म्हसळामधील खरसई, मुरूड येथील मजगाव, पनवेलमधील वावेघर, पेणमधील आमटेम, पोलादपूरमधील लोहारे, रोहामधील कोलाड, श्रीवर्धनमधील वडवली, सुधागडमधील वाघोशी, तळामधील वाशी हवेली, उरण तालुक्यातील मोठी जुई या शाळांची त्यासाठी निवड केली आहे.
शाळेची आकर्षक इमारत, क्रीडांगण, शैक्षणिक क्रीडा साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय यांसारख्या भौतिक सुविधा असणार आहेत. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षण दिले जाणार आहे. वाचनाचा सराव करणे अशा अनेक प्रकारच्या योजना राबवून शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येतील.
आदर्श शाळेकडे ग्रामस्थ आकर्षित होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्यास तयार होतील, अशा पद्धतीने याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. शाळांमध्ये गुणवत्ता भविष्यात किमान शंभर ते दीडशे पटसंख्या वाढविणे, विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या तयार करण्याचा अधिकाऱ्यांनी मानस व्यक्त केला.
या देणार सुविधा
मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे बांधणे - मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह व भांडार कक्ष - शाळेला संरक्षण भिंत बांधणे - आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून अग्निरोधक यंत्र बसविणे - आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ बाहेर पडण्याची व्यवस्था करणे - शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे. - उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत व देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाठविणे - पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणे.
रायगड जिल्ह्यातील आदर्श शाळांना विकसित करण्यासाठी शाळांमध्ये शासकीय निधीशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यातून शाळांचा विकास होऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.