अलिबाग : जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीतर्फे (jsw steel company) डोलवी येथील कारखान्यात जागतिक दर्जाची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (Pollution control system) बसवण्यासाठी दोन हजार कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक करण्यात येणार आहे. डोलवी प्रकल्प (dolavi project) हा जेएसडब्ल्यू स्टीलचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा एकात्मिक स्टील-उत्पादन कारखाना आहे. कंपनीच्या भारतातील एकूण स्टील क्षमतेच्या ३८ टक्के स्टील क्षमतेची हाताळणी या कारखान्यातून करण्यात येते; मात्र यामुळे प्रदूषणाची (Pollution problem) गंभीर समस्याही निर्माण झाली आहे. यावर मात करण्यास जेएसडब्ल्यूला यश येण्याची शक्यता आहे.
प्रदूषण नियंत्रण उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. जागतिक मापदंडांशी सुसंगत अशी या कारखान्यांची कामगिरी उंचावण्याची अपेक्षा आहे. डोलवी येथील जेएसडब्ल्यूच्या एकात्मिक स्टील उत्पादन कारखान्यात जागतिक दर्जाची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आल्याबद्दल जेएसडब्ल्यू स्टील डोलवी वर्क्सचे अध्यक्ष गजराज सिंग राठोड यांनी सांगितले, की शाश्वतता आमच्या सर्व व्यवसायांचा आणि कारखान्यांचा गाभा आहे.
आमच्या पर्यावरणीय कामगिरीमध्ये सुधारणा आणण्यासोबत आमच्या वातारवणीय बदल धोरणासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.गेल्या पाच वर्षांत आमच्या पर्यावरण व शाश्वतता टीमने यासंदर्भात बऱ्यापैकी प्रगती साधलेली आहे. यात स्रोत क्षमतेत सुधारणा, किमान उत्सर्जन करणाऱ्या इंधनांचा वापर, कचऱ्यापासून संपत्ती धोरणांची अंमलबजावणी आदी उपाययोजनांचा समावेश आहे असेही त्यांनी सांगितले.
कंपनीने केलेल्या दोन हजार कोटींची गुंतवणूक आमच्या उत्पादनातून होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. यामुळे आमच्या डोलवी वर्क्स कारखान्याच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा व पर्यावरण यात सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल. यापैकी काही यंत्रणा बसवण्यासाठी आम्ही पहिल्या टप्प्यात सुमारे ८०० कोटी खर्च केले आहेत. यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.