traffic rules  
मुंबई

वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट कोर्टात ; वाचा सविस्तर

CD

मुंबई : वाहतूक नियम मोडल्यानंतर (traffic rules) ई-चलान (E-challan) आले, पण चलानवर दंडाची रक्कम (fine) शून्य असेल, तरी निश्‍चिंत राहण्याचे कारण नाही. वाहतूक नियम मोडल्यानंतर दंडाची तरतूद नसली तरी थेट न्यायालयाची पायरी (case direct in court) चढावी लागणार आहे. यापूर्वी २० नियमांमध्ये न्यायालयाची पायरी चढावी लागत होती. आता यामध्ये ३१ नव्या नियमांची भर पडली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास २० नियम हे पार्किंगशी (Parking rules) संबंधित आहेत. मुंबईत आधीच पार्किंगसाठी जागा कमी आहे. (Direct action in court after breaking traffic rules)

त्यात पार्किंगशी संबंधित नियम कठोर केल्यामुळे नवे वाद उफाळण्याची शक्यता आहे. या नियमांबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘नवीन नियमांमुळे आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना वाहने रस्त्यावर काढणेच मुश्किल होईल, असे मत परळ येथील मोहन सानप यांनी व्यक्त केले. तुम्ही सामान्यांना न्यायालयात खेचणार, मग सरकार किंवा संबंधित प्रशासनाने पार्किंगची पण तेवढी व्यवस्था करायला हवी, असेही सानप म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक नियमावलीत अशा काही नियमांचा समावेश करण्यात आला आहे की, ते नियम तोडल्यास थेट न्यायालयात जावे लागणार आहे.

अतिधोकादायक यादीत येणाऱ्या नियमांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. वाहन चालकाला काय शिक्षा द्यायची किंवा किती दंड आकारायचा हे न्यायालयच ठरवणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना नियमांबाबत अधिक सतर्क रहावे लागणार आहे. पूर्वी पार्किंगचे नियम मोडल्यास जास्तीत जास्त २०० रुपयाचा दंड होता, परंतु नव्या नियमावलीनुसार आता थेट न्यायालयात जावे लागणार आहे. चौकट ‘नॉन कम्पाऊंडेबल ऑफेन्सेस’ वाहतूक कायद्यामध्ये यापूर्वी ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर वाहनाचा वेग कमी केला नाही, यासारख्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात जावे लागत होते.

मात्र नव्या कायद्याअंतर्गत नियमांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यात केवळ २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता, या स्वरूपाच्या गुन्ह्याचा समावेश आता ‘नॉन कम्पाऊंडेबल ऑफेन्सेस’ (समझोता न करण्यायोग्य) या नियमात करण्यात आला आहे. या नियमांचा भंग केल्यास न्यायालयात जाल - समोरील वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे - वाहने चालवत असताना लेन कटिंग करणे - चुकीच्या दिशेने वाहन चालवणे - डबल पार्किंग करणे (पार्किंगमध्ये असलेल्या वाहनाच्या बाजूला किंवा मागे पुढे) - नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यानंतर गाडीला जॅमर लावले असल्यास - कोणताही सिग्नल न देता डाव्या किंवा उजव्या बाजूला वळणे. नो पार्किंगमध्येही सावधान - नो पार्किंगमध्ये वाहने लावणे.

एखाद्या बोगद्यात, भुयारी मार्गात पार्किंग करणे - इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर पार्किंग करणे - दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ पार्किंग करणे - अन्य वाहनांना अडचणीची ठरणारी पार्किंग करणे कोट नॉन कम्पाऊंडेबल ऑफेन्ससाठी वाहतूक विभागाकडून वाहनचालकाला त्याने मोडलेल्या नियमाची माहिती देऊन न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात येते. त्या गुन्ह्यांना किती दंड आकारायचा हे आता न्यायालयच ठरवणार आहे. - राज तिलक रोशन, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT