मुंबई

काळजीचा ''बुस्टर'' डोस हवा

CD
काळजीचा बूस्टर डोस हवा भाग्यश्री भुवड इंट्रो सरत्या २०२१ या वर्षात कोरोनाचे नवे नवे घातक आणि सौम्य प्रकार बहुतेकांनी अनुभवले. कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत असतानाच पुन्हा नव्या वर्षाच्या तोंडावर रुग्ण दुपटीने वाढू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरच सर्वांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र बूस्टर डोस असला तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सर्वांनी सर्वतोपरी काळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहे. मुंबई, ता. ३१ : २०२० वर्ष हे कोरोना व तो रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गेला. त्यानंतर १६ जानेवारी २०२१ मध्ये देशभरात लसीकरणाला सुरुवात झाल्याने आपण लवकरच कोरोनाला मात देऊ, अशी आशा निर्माण झाली होती. वर्षभरात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत असले, तरी लसीकरणासमोर हे व्हेरिएंट तुलनेने निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्येकाने लशीचे दोन्ही डोस घ्यावेत यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र आता ओमिक्रॉनमुळे सर्वांना धडकी भरवली असली तरी बूस्टर डोसमुळे २०२२ हे वर्ष आरोग्यदायी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोरोना काळातील प्रत्येक दिवस हा आठवणीत राहण्यासारखा आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स्टिंग ही त्रिसूत्री पाळणे प्रत्येक दिवसाची गरज होती. ही त्रिसूत्री नव्या वर्षातही पाळावीच लागणार आहे. २०२१ च्या अखेरीस लसीकरणानंतर आर्थिक, सामाजिक आणि सर्वच थरांतील डबघाईस आलेले जीवनमान नवी भरारी घेताना दिसून आले. या वर्षभरात लसीकरणासह अनेक सकारात्मक बाबी दिसून आल्या. नागरिक आता आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. त्याअनुरूप आपल्या जीवनशैलीत बदल करून निरोगी जीवन जगणे हे आपल्याच वागण्यावर अवलंबून असल्याचे कोरोनाने दाखवून दिले आहे. देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी घोषित करण्यात आला. या वेळी कोरोना आलेख कमी होत असल्याचे समोर आले. त्यानंतर १ मार्चला सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील मात्र सहव्याधी असलेल्यांना लस देण्यास सुरुवात झाली. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आणि त्यानंतर लहान मुलांचे लसीकरण सोडल्यास प्रत्येक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण टप्प्याटप्प्यात सुरू झाले. आता राज्यात जवळपास ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात सर्वांचे लसीकरण होणार असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे. मुंबई  मॉडेलचे जगात कौतुक- देशात आणि राज्यात भयावह स्थिती असताना मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी झाल्याने मुंबई मॉडेलचे जगभरात कौतुक होण्याचा गौरवास्पद क्षण याच वर्षी मुंबईकरांनी अनुभवला. मुंबई मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील बहुतांश देशांनी स्तुती केली. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये राज्यात एकाच दिवसात १४.३९ लाखांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. अशी रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारे राज्य हे देशातील पहिले राज्य होते. त्यानंतरही लसीकरणात राज्याने अव्वल क्रमांक कायम ठेवला. लशीचा गोंधळ एकीकडे शासन कोरोनाविरुद्ध सर्व शक्तीने लढत असताना लशीबाबतच्या अफवादेखील पसरण्यास सुरुवात झाली. मे महिन्याच्या दरम्यान लस घेतलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत होते. यातून लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे सरकारने लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली; तर कोविन अॅपमधील लस नोंदणीच्या गोंधळाच्या घटनादेखील समोर आल्या. याच वेळी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला. लसीकरण मोहिमेच्या खासगीकरणावरूनही बराच गोंधळ उडाला. लाभार्थींची संख्या वाढत असताना लसतुटवडा निर्माण झाला होता; मात्र काही महिन्यांनंतरच ही स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसले. दुसऱ्या डोसला टाळाटाळ कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने बेफिकिरीतून दुसऱ्या डोसला अनेक नागरिक टाळतानाही दिसून येत आहे. हे चित्र अद्याप कायम आहे. याचदरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत जगात पसरली. २ डिसेंबर २०२१ रोजी भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाला. कर्नाटकात पहिल्या दोन ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. त्यानंतर मुंबईतही हे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा कमी घातक असला तरीही तिसऱ्या लाटेसाठी तो कारणीभूत ठरू शकतो, अशी सरत्या वर्षाच्या साक्षीने भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोविडची विविध रूपे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोना विषाणूची विविध रूपे म्हणजे व्हेरिएंट. कोरोनाची अशी ५० व्हेरिएंट असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात. या प्रत्येक व्हेरिएंटची लक्षणे आणि आरोग्यावरील परिणाम वेगवेगळे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सर्वांपेक्षा डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम डोळ्यात पाणी आणणारा ठरत होता. या डेल्टा व्हेरिएंटमुळेच दुसरी लाट आली होती व त्यामुळे व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा यासारख्या समस्यांमुळे जीवनमान ढवळून निघाले होते. सरकार यावर मात करण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते; मात्र या डेल्टाचा प्रभावच एवढा होता, की त्यात पहिल्या लाटेपेक्षा अधिक मृत्यू झाले. देशभरात हा कालावधी आकाश फाटल्याप्रमाणेच होता. सक्षम आरोग्य व्यवस्थेअभावी ठिगळ कुठे कुठे लावायचे, हा प्रश्न सतत आवासून उभा होता; मात्र लसीकरणानंतर त्याचा प्रभाव ओसरत गेला.   म्युकरमायकोसिसनेही धडकी कोरोना संसर्गामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजारानेही धडकी भरवली. सण-उत्सवांतून उसळणाऱ्या गर्दीमुळे डेल्टा व्हेरिएंटबरोबरच म्युकरमायकोसिस म्हणजे बुरशीचा संसर्गही पसरू लागला होता. म्युकरमायकोसिसमुळे अनेकांना आपले डोळे गमवावे लागले. म्युकरमायकोसिसवर अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जीवनदायी ठरत होते. मामोइंजेक्शन जीवनदायी ठरत असताना काळ्या बुरशीबरोबर पांढरी, पिवळी तसेच हिरव्या बुरशीचा संसर्ग समोर येत होता. लसीकरणानंतर आता हे चित्र बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. ०२२ कडून आशा जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचा धोका असला तरी २०२२ मध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू, असा दावा केला आहे. तसेच कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट महामारीचा शेवट करेल, असे मतही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे २०२१ या वर्षाची सुरुवात जशी लसीकरणाच्या सकारात्मक मोहिमेतून झाली, तशीच २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात कोरोनामुक्तीकडे या आशेतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT