Varsova creek bridge google
मुंबई

वर्सोवा खाडीवरील वाहतूक कोंडी फुटणार?

भाईंदर पश्‍चिमेपर्यंत मुंबईतील लिंक रोडचा विस्तार

- समीर सुर्वे

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad highway) वर्सोवा खाडीवरील (varsova creek) वाहतूक कोंडी (traffic jam) येत्या काही वर्षांत फुटण्याची शक्यता आहे. दहिसर पश्‍चिमेपासून मिरा रोडमार्गे भाईंदर पश्‍चिमेपर्यंत मुंबईतील लिंक रोडचा (Mumbai link road expansion) विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई पालिका (BMC) आणि मिरा-भाईंदर पालिका (mira-bhayandar municipal corporation) मिळून हा प्रकल्प उभारणार आहे. (Mumbai-Ahmedabad highway varsova creek traffic jam escape possibilities)

या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साधारण १,५०० कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. तसेच हा मार्ग पश्‍चिम द्रुतगती मार्गाशीही जोडण्यात येणार आहे. मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात वांद्रेपासून दहिसरपर्यंत लिंक रोड आहे. दहिसरला हा रस्ता संपतो. मात्र, महामुंबईच्या नियोजनानुसार हा रस्ता भाईंदर पश्‍चिम आहे. महापालिकेने या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत गुरुवारी ‘ट्विट’ केले. सहा किलोमीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीचा हा रस्ता बांधण्यात येणार आहे.

त्यातील दीड किलोमीटरचा भाग मुंबई पालिका हद्दीत आणि ४.५ किलोमीटरचा भाग मिरा-भाईंदर पालिका हद्दीत येतो.भविष्यात विरारपर्यंत भाईंदरपर्यंत रस्त्याच्या कामाचा निर्णय झाला आहे. त्यानंतर भविष्यात हा रस्ता विरारपर्यंतही वाढवता येऊ शकतो. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

फायदे काय ?

पश्‍चिम उपनगरातील पश्‍चिमेकडील वाहने थेट लिंक रोडवरून भाईंदरपर्यंत जाऊ शकतील. - त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ताण कमी होईल. वर्सोवा खाडीपूल, फाऊन्टन जंक्शन येथील वाहतूक कोंडी फुटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT