वाशी : कोरोना रुग्णांमध्ये (corona patients) झपाट्याने वाढ होत असतानाच वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणातील गारवा वाढल्याने आजार बळावले आहेत. वाशीतील पालिकेच्या (Navi Mumbai municipal corporation) बाह्यरुग्ण विभागात गर्दी होत असल्याने आरोग्य विभागावर ताण वाढला आहे. दररोज १२०० पर्यंत रुग्णांची तपासणी केली जात आहे. ऐरोली, नेरूळ तसेच महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रामध्येही संसर्गजन्य आजाराच्या (infectious diseases) रुग्णांची संख्या वाढली आहे. (Infectious diseases patients increases after climate changing situation)
वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य सर्दी, खोकला, तापचे रुग्ण वाढले असून नागरिकांनी कोविड असून घाबरून न जाण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मात्र ताप जास्त असल्यास त्वरित कोविड तपासणी करून उपचार घ्यावेत, असेही सूचविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णांचा आकडा दोन ते अडीच हजारावर गेला आहे. अवकाळी पाउस, तापमानातील घसरणीमुळे सगळीकडे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे.
सध्याच्या करोना संसर्गाची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वाशी, ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालयात दररोजच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची संख्या आठवडाभरापासून वाढतच आहे. खासगी क्लिनिकमध्येही रुग्ण गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आरोग्यसेवेवर ताण पडत आहे. त्याचा फटका मात्र गरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांतही सकाळच्या वेळात रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यात आरोग्य विभागातील जवळपास दहा टक्के मनुष्यबळास कोरोनाची लागण झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. नवी मुंबई शहरात पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला ११०० ते १२०० ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण येत आहेत. परंतु हा वातावरणातील बदल असून ताप आला म्हणजे कोरोना झाला असे नाही. नागरिकांनी साधा तापही अंगावर न काढता योग्य उपचार घ्यावेत. तसेच संसर्गजन्य आजार असल्यास घरीच आराम करावा. - डॉ. प्रशांत जवादे, सार्वजनिक रुग्णालय, वाशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.