मुलुंड : राज्यसह मुंबई शहरामध्ये कोरोनाचा आलेख (corona infection) उंचावत असल्याने मुलुंड पश्चिम येथील ऑक्ट्रॉय नाका येथील जम्बो कोविड केयर सेंटरमधील (corona center) ३८ आयसीयू बेडचे (Icu beds) कोविड केयर केंद्र सुरू करण्याची मागणी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा (Mihir kotecha) यांनी केली आहे. मुलुंड पश्चिम येथील ऑक्ट्रॉय नाका येथील जम्बो कोविड केयर सेंटरमध्ये ३८ आयसीयू बेड, १२ व्हेंटिलेटर्स, २५ बायपॅप मशीन अशी व्यवस्था मागच्या लोटेवेळी होती. (start icu facilities in corona center in mulund demand of mla mihir kotecha)
कोरोनाची संख्या कमी झाल्यावर सदर केंद्र बंद करण्यात आले होते. सध्या मुंबईमध्ये सरासरी २० हजारच्या पुढे नवीन रुग्ण आढळत आहेत. परिणामी आयसीयू बेडची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता तातडीने या केंद्रामधील ३८ आयसीयू बेड कोविड केयर केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कोटेचा यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकाणी यांना पत्राद्वारे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.