मुंबई

दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण

CD
दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवासी संतप्त वाशी, ता. ९ (बातमीदार) : दिघा येथील बिदुमाधव नगर व दफनभूमीच्या मागील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांकडून अनधिकृत चाळी बांधण्यात येत आहेत. या चाळी बांधून गरजवंतांना विकून त्यांची फसवूणक करण्यात येत आहे. लाखो रुपयांना या चाळीमधील रूम विकण्यात येत आहेत. चार महिन्यांपासून ही बांधकामे सुरू आहे; पण प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दिघा येथील उच्च न्यायालयाने ९९ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामधील पाच इमारती या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिघामध्ये एकही इमारत पुन्हा उभी राहू शकली नाही. त्यामुळे आता राजकीय नेत्यांच्या वरदहस्तांमुळे एमआयडीसीचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. या मोकळ्या भूखंडांवर चाळी बांधून त्या गरजवंतांना विकण्यात येत आहेत. दिघा येथे प्रस्ताविक रेल्वेस्थानकांचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील झोपड्यांचा भावही वधारला आहे. परिणामी, मोकळ्या भूखंडावरील जागेलाही भाव आला आहे. त्याच जागेवर चाळी बांधून विकण्यात येत असल्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाचेही यामध्ये आर्थिक लागेबांधे असल्यामुळे त्यांनीही याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी मनोहर गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. - एस. एम. गित्ते, एमआयडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palakkad Train Accident: केरळमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू! पलक्कडमध्ये घडली भीषण घटना

Rohit Sharma च्या घरी नवा पाहुणा येणार! Ritika चा तो फोटो अन् समालोचक हर्षा भोगलेंचं ते विधान...

Sports Bulletin 2nd November : भारताची न्यूझीलंडविरूद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल ते भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागणार

Video : महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद! कुठंए हे मंदिर? जाणून घ्या

Eknath Shinde प्रचाराचा नारळ कधी फोडणार? तारीख आणि जागाही ठरली! 'या' दिवशी घेणार पहिली जाहीर सभा

SCROLL FOR NEXT